चौसष्ट योगिनी मंदिर

आपल्या देशामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, यांपैकी बरीच मंदिरे हि १,५०० वर्षे जुनी आहेत. भारतामध्ये सर्वात जुनी मंदिरे मध्य प्रदेशात सापडतात. हि सर्व मंदिरे गुप्त काळातील असून आजपासून साधारण १,५०० वर्षे जुनी आहेत. सुरुवातीला ह्या मंदिरांची रचना अगदी साधी असायची. मात्र नंतरच्या काळात मंदिरांमध्ये वैशिष्ठ्यपूर्ण बदल झाले.

असेच वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे ६४ योगिनी मंदिर होय. या ६४ योगीनि बाबत अनेक वेगवेगळ्या कथा आढळतात. काही कथांप्रमाणे या ६४ योगिनी पार्वतीचीच रूपे असून, ह्या देवता भगवान शंकरांना युद्धात मदत करायच्या. तर काहींच्या मते ह्या ६४ योगिनी म्हणजे ६४ कला आहेत.

या देवतांची मंदिरे हि मध्यप्रदेशामध्ये, खजुराहो, भेडाघाट, मोरेना जवळ आढळतात. तर ओरिसा मध्ये भुवनेश्वर जवळील हिरापूर गावातही ६४ योगिनीच मंदिर आहे. या मंदिरांचे वैशिष्ठ्य म्हणजे हि मंदिरे प्रामुख्याने गोलाकार असतात.

असेच एक मंदिर म्हणजे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जवळचे मोरेना मंदिर होय. हे मंदिर ग्वाल्हेर शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला साधारण २०० पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर राजा देवपाल याने साधारण १३ व्या शतकात बांधलं. मंदिर हे गोलाकार असून याच्या ६४ कोनाड्यात ६४ योगिनींच्या मुर्त्या आहेत. तसेच या मंदिराच्या मधोमध भगवान शिवाचे मंदिर आहे. असं मानलं जातं कि ह्या मंदिराचीच प्रेरणा घेऊन आजचं भारतीय संसद भवन बांधलं गेलं. दुर्दैवाने, ह्या मंदिराचे एवढे महत्व असूनही हे मंदिर भारतीय पर्यटकांकडून दुर्लक्षीतच राहीलं.

तुम्ही जेव्हा ग्वाल्हेर शहराला भेट द्याल तेव्हा हे मंदिरही अवश्य पहा. ह्या मंदिरामध्ये कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. या मंदिरासोबत तुम्ही बटेश्वर मंदिर समूहाला ही भेट देऊ शकता. मोरेना मंदिर आणि बटेश्वर मंदिर बघण्यासाठी तुम्हाला एक दिवस राखून ठेवावा लागतो. या भागाला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू योग्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!