जन्मजन्मांतर

जन्मजन्मांतर
सौंदर्य तुझे पहाटे पांघरावे,
पहाटे क्षणी तुझे रूप देखावे,
तुझे डोळे पाणीदार गडे…
जसे… न भिजता चिंब व्हावे.
मोकळ्या केसांत मनाला गुंतवावे,
त्यातून हात फेरतांना उगाच गुरफटावे.
त्या विचलित करणार्‍या सुगंधात
दिवसभर आपादमस्तक झिंगावे.
मिठीत तुझ्या स्वर्गादपी सामवावे,
त्यातच सर्व तन, मन, इति झोकावी.
तुझ्या या प्रेमाची उब प्रिये…
उभ्या आयुष्यभर जपावी.
तूच माझ्या ह्रुदयात कोरलेली प्रतिमा,
तूच हास्य, करूण अन् शृंगार रसातील प्रतिभा.
तू जवळ असतांना वाटते, सर्व काही दूर सारावे,
तुझे असीम प्रेम, जन्मजन्मांतर मागावे.
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments