बांबू महिमा

बांबू महिमा
आदिवासींच्या जीवनात बांबूचे महत्त्व खूप,
जन्मापासून मृत्यूपर्यंत उपयोगी पडते,
दुःख असो वा सुख !
बांबूच्या बिया दळून भाकरी,
कोवळ्या बांबूची भाजी, आणि त्यासोबत
चवीला बांबूचचं लोणचं भारी !
घरातल्या वस्तूही बांबूच्याच,
चटई, खाट, टोपली, सूप पोळपाट लाटण,
एवढच काय पाटासुद्‌घा बंबूचाच!
या सर्व वस्तू उपयोगी वापरात पडते घरोघरी,
या वस्तू ज्या घरात सापडतात ते घरही बांबूचेच !
बासरी वाजविण्यासाठी बांबू व मारामारीसाठीही बांबूच !
संपूर्ण जीवन बांबूवर जगल्यावर, अंतीम यात्रा तिही बांबूवरच !
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments