गुढी पाडवा

गुढी पाडवा हा वसंत ऋतुचा पहिला दिवस आणि शालिवाहन सवत्सराचा ही पहिला दिवस.शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी मातीचे सैनिक तयार करून त्यांच्यात प्राण आणले व शकांचा पराभव केला अशी अख्यायिका प्रचलित आहे.याच शलिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू झाली व हे शक सुरू झाले.प्रतिपदा म्हणजे ही महिन्याचा पहिला दिवस ब्रह्मदेवाने ही तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून निश्चित केली.या तिथीला युगादी तिथी ही म्हणतात. याच तिथीला गुढी पाडवा हा सण ही येतो.

गुढी पाडवा हा हिंदूंचा नवं वर्षाचा पहिला दिवस.या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होत असल्याने सृष्टीत नवीन चैतन्यदायी बदल घडतात.सृष्टीची सगळी मरगळ निघून जाते वसंत ऋतुचा आगमनाने झाडाची पानगळ थांबून नवीन हिरव्या,पोपटी रंगाची इवली इवली पान झाडावर डोलू लागतात.पक्षांची किलबिल वाढू लागते.सगळीकडे आनंद,चैतन्य अगदी भरभरून असते म्हणूनच ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी सृष्टीची रचना केली असावी.हा दिवस म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.श्री रामाचा जन्मोत्सव पाडव्यापासूनच सुरु होतो. श्री रामाचा १४ वर्षाचा वनवास संपून रावणाचा पराभव करून ते आयोद्येत याच दिवशी परत आले म्हणून हा दिवस महत्वाचा. तसेच नवीन वास्तू. नवीन वाहनं, सुवर्ण खरेदी किंवा व्यवसाय प्रारंभ यासाठी पाडव्या सारखा शुभ मुहूर्त नाही. आपल्या सगळया सणांमागे पूर्वजांचे वैज्ञानिक विचारच आपल्याला पाहायला मिळतात. संत एकनाथ,जनाबाई,ज्ञानेश्वर,तुकाराम या संतांच्य अभंगात ही गुढीचा उल्लेख आला आहे.

एका स्वच्छ घुतलेल्या काठीला गंध लावून टोकावर रेशमी वस्त्र गुंडाळतात त्यावर कडुलिंबाची डहाळी,आंब्याची डहाळी,फुलांची माळ,साखरेची गाठी ठेऊन त्यावर तांब्याचा कलश उपडा ठेवतात तंब्यावर स्वस्तिक काढून त्यावर अक्षदा लावतात. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे यातून सात्विक स्पंदन बाहेर पडतात म्हणून आपल्याकडे स्वस्तिक काढण्याची प्रथा आहे.अशी ही दारा जवळ उभारली गुढी विजय व समृद्धीच प्रतीक आहे.या उभारलेल्या गुढीला ब्रम्हध्वज असेही म्हणतात. अशीही गुढी सूर्योदयानंतर लगेचच उभारावी. गुढीला लावलेल्या सर्वच गोष्टींचे आपल्या जीवनात महत्व आहे .कडुलिंब ही वनस्पती आजूबाजूचे वातावरण शुद्ध करते हे आपल्याला माहीतच आहे पण या वनस्पतीची पाने धुवून त्यात ओवा,मीठ,हिंग,मिरे साखर घातलेली चटणी किमान आजच्या दिवशी तरी खावी म्हणून याचे महत्व आहे . ऋतू बदलतात तसे वातावरणही बदलते त्या मुळे शरीरात पित्त वाढते ही पानांची चटणी पित्त शामक आहे याने पचन क्रिया ही सुधारते शिवाय त्वचारोग ही बरे होतात म्हणून खण्याबरोबर पाने अंघोळीच्या पाण्यात ही आवर्जून टाकावीत. अवकाशात उच्च ब्रम्हतत्व असते सात्विक शुद्ध लहरी असतात. गुढिवर असलेल्या तांब्याच्या कलशामुळे या शुद्ध लहरींचा कलशाशी संमंध येतो व सात्विक लहरी निर्माण होतात हा कलश उपडा असल्याने तांब्याच्या पोकळीतून येणाऱ्या या लहरींमुळे रेशमी वस्त्र, पाने ही भारीत होतात तसेच भूमीच्या आकर्षण शक्ती मुळे या लहरी जमिनीवरही पसरतात व आजूबाजूचे वातावरण सात्विक होते. या लहरींना प्रजापती लहरिही म्हणतात या लहरींमुळे चैतन्य,आनंद वाढणे,बुद्धी प्रगल्भ होणे ,जमिनीला पाझर फुटणे,जमिनीची क्षमता वाढणे इत्यादी परिणाम होतात म्हणूनच गुढी वर तांब्याचा कलश असतो, गाठी ही थंड गुणधर्माची असते वातावरणात आता उकाडा वाढायला लागलेला असतो या गाठी असलेले पाणी पिण्याने शरीराला थंडावा मिळतो म्हणून लहान मुलांच्या गळ्यात आपण गाठी घालतो.

महाराष्ट्रासह देशात व इतर देशातही काठी पूजा तसेच उत्चवी काठी ची इतिहासात विविध समुदायात प्राचीन काळापासून करण्याची परंपरा आहे.हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा करतात.

महाराष्ट्रात गुढीपाडव्याशिवाय जतर काठी, काठीवाडी,नंदिधवज,हे काठी उत्चव साजरे होतात तर राजस्थान व मध्य प्रदेशात काठी मातेची पूजा व नृत्य करतात,तेलंगणा,काश्मीर,गोवा, आंध्प्रदेश येथेही काठी पूजा करतात.नेपाळ,आसाम,त्रिपुरा,मणिपूर इथेही काठीपूजा करतात इतकेच नाही तर दक्षिण आफ्रिकेत दामारा जातीच्या जमाती मध्ये काठीपुजा करतात. असा हा विविध ठिकाणी साजरा होणारा गुढी पाडवा.

नवं सूर्योदय,नवी प्रभा
नवं तेजोमय असे दिशा
नवं सृजनाची चाहुल लावीत
सरून जाऊदे तीमिर निशा

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments