किलबिलती पाखरे

किलबिलती पाखरे

 

आमची किलबिलती पाखरे

भुरकन दूर देशी निघून गेली,

का रे गड्‌यांनो, कधी शाळेची

तुम्हा आठवण नाही आली?

 

शाळेत होते भांडत झगडत

आणि उद्यानात बागडत,

किती वर्षे गेली मित्रांनो

बालपण पुन्हा नाही उलगडत.

 

इतक्या वर्षानंतर सर्व

इथे एकत्र भेटले,

एकमेकांच्या आठवणी काढून

कंठ सर्वांचे दाटले.

 

कुणी डॉक्टर, इंजीनियर झाले,

तर कुणी वकील, प्रोफ्रेसर,

आज कुणी व्यावसायिक, नट,

तर कुणी फार्मासिस्ट, टिचर.

 

तीच सर्वांची मैत्री आज

परत बहरून आली,

इतक्या वर्षांची असलेली दूरी

क्षणात नाहिशी झाली.

 

गप्पाटप्पा, गुजगोष्टी

कुठे एकमेकांची टर,

कुणाला वाईट तर वाटणार नाही?

याची कुणालाच नाही फिकर.

 

असे वाटते आपल्या सर्वांचे,

जुने दिवस परत आलेत.

दूर जरी असलो तरी

हृद्‌याच्या कप्यात बसून गेलेत.

 

भेटू मित्रांनो आपण सर्व

स्नेहसंमेलन आयोजित करू,

जुने सर्व मित्र परत

एकमेकांच्या जिवनात रंग भरू.

 

“कविमोल” अमोल बारई

 

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments