रंगपंचमी

रंगाचं माणसांच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे.अनेक रंग एकमेकात मिसळून ज्या प्रमाणे नवीन रंगांच्या छटा तयार होतात तसेच आनंद,दुःख,समाधान,चैतन्य असे रंग मिळूनच माणसाचं आयुष्य हे देखील रंगीबेरंगी होऊन जातं.प्रत्येक रंगाचं आपलं आपलं एक वैशिषट्य असल्यामुळेच त्यांचं महत्व आहे.महाराष्ट्रात फाल्गुन कृष्ण पंचमी हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा करतात पण आता होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंग खेळतात . खर तर धुळवडीच्या दिवशी जमिनीला , मातीला नमस्कार करण्याची प्रथा असते .प्रत्येक प्राणी पंच महा भुतांचा बनलेला आहे पृथ्वी पासून याची सुरुवात होऊन आकाश तत्वा पर्यंत आपल्या सणातून निसर्गाचा आदर व्यक्त केला जातो म्हणून या दिवशी होळीची राख अंगाला लावतात .होळी जवळ पाणी ठेऊन त्या पाण्याने अंघोळ केल्यास उन्हाळा बाधत नाही असे म्हणतात . पण या दिवसाचं महत्त्व विसरून लोक आपल्या सोईसाठी याच दिवशी रंग पंचमी साजरी करतात . या दिवशी उत्तर भारतात नांदगाव, बरसाना , मथुरा ,वृंदावन इथे रंग खेळतात .याचे राखेची होळी , फुलांची होळी, लठमार होळी असे विविध प्रकार असतात . थोडक्यात काय तर प्रेम ,मैत्री वाढवण्यासाठी व वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी निसर्गा बद्दल आदर व्यक्त करण्यासाठीच या सणांची निर्मिती असते . असं असल तरी महाराष्ट्रात मात्र धुळवड आणि रंगपंचमी हे वेगवेगळे साजरे होतात . आपल्या चालत आलेल्या रूढी ,परंपरा आपणच जपायला हव्यात .

वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागताच सुष्टित चैतन्यदायी बदल घडतो.झाडाची जुनी पाने गळून पडतात व नवीन पलव्यानी झाड बहरून येत.हिरवे तांबूस पोपटी रंगांची लयलूट होते. पांढरा चाफा , सुगंधी मोगरा , लालचुटुक गुलमोहोर , पिवळाजर्द बहावा , लालबुंद पळस ,नाजूक मोहक मधुमालती अशा विविध रंगाने व गंधाने वसंत ऋतू नटलेला असतो . या चैतन्याचे प्रतीक म्हणून आपण रंगपंचमी साजरी करतो.हिवाळा संपतो व उन्हाळा सुरू होणार असतो उन्हाची काहीली वाढू लागते त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून ही आपण रंगपंचमी साजरी करतो,हा सण तसा होळी पासूनच सुरू होतो.या सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगन्यात येत असल तरी रंगपंचमी वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून ही साजरा केला जातो.

रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याचीही पद्धत आहे. असं म्हणतात द्वापारयुगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असतं. तिच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे. हा सणाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी या सणामुळे आजही नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. थोडक्यात सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणाची निर्मिती केली गेली असावी.

अशा या वसंत सुंदर चैतन्यदायी वसंत ऋतू च्या व रंगपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments