१२ हा अंक

१२ हा अंक

१२ हा अंक अचानक प्रकर्षाने जाणवला,
कारण १२-१२ चा योग पुन्हा एकदा आला.

तसा त्याचा संबंध आपल्याशी खुप आधीच आला,
श्रीगणेशा शिक्षणाचा आपल्या बाराखडीने झाला.

घड्याळ्यातही असतात एकूण अंक बारा,
इंग्रजी महिने बारा आणि मराठी माससुद्‌धा बारा.

शंकराच्या अस्तित्वाची ज्योर्तीलींग बारा
शास्त्रानुसार पुजनाचे आदित्यही बारा..

तारांगणात असणारे एकूण ग्रह बारा, आणि
अंकशास्त्रानुसार त्यागाचा अंकही बारा.

कुंडलीमध्ये शक्तीस्थाने आखलेली असतात बारा,
ज्योतिष्यशास्त्रात असणारे नक्षत्रही बारा.

अशा १२-१२ ला उघडणार आनंदाचे दार,
कुठे उडणार लग्नाचा बार तर कुठे…
दवाखान्यात जन्मणार कित्येक गोंडस बाळं.

“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments