आली आपली चाळिशी

आली आपली चाळिशी
गेले ते बालपण
तरुणपण सुद्धा ओसरले,
आमच्या मित्र-मैत्रिणींना
बघा चाळीशीने घेरले.
बघता बघता आयुष्याची
शैक्षणिक वर्षे संपली,
घरादाराची जवाबदारी येऊन
कामाला सर्व जुंपली.
सकाळ झाली नाही की
कामावर जायची तयारी,
मुले बाळे घरोघरी
अक्षरशः घ्यावी लागते भरारी.
दिवसभर राबून राबून
लागतो दम सर्वांचा,
सायंकाळी घरी आल्यावर
भडिमार दिवसभराच्या कर्मांचा.
शरीराचे दुखणे खुपणे,
नाना व्याधींनी ग्रासले,
विविध रंगाच्या औषधांनी
आपले बेडरूम आहे सजले.
मुलांना बघून आजही
आपले बालपण आठवते,
काय मित्रांनो, काय म्हणता…
अधूनमधून आठवणींतून…
शालेय जीवन डोकावते ?
म्हातारपणाकडे वाटचाल
आता आपली सुरू आहे,
चाळिशीनंतर आता खरी
परिवाराची भिस्त….
आपल्या खांद्यावर डोलत आहे.
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments