लग्नाचा वाढदिवस

लग्नाचा वाढदिवस
आम्हा दोघांच्या आयुष्यात
आहे पुर्णत्वाची भावना,
असो सदैव अमाप आनंद
कधी नको त्या वेदना.
आम्ही दोघेही अगदी
एकमेकांना साजेशे,
आसमंतात अत्यानंद
राहतो नेहमीच मजेसे.
आमच्या लग्नाच्या वाढदिवशी
आम्ही करीतो वरिष्ठांना वंदन,
संबंधाचे मिलन म्हणून
स्विकारू शुभेच्छांसह अभिनंदन !
असेच असू प्रफुल्लित
आणि सदा मनमिळावू,
आम्ही एकदुसऱ्यांना समर्पक
पुढेही गुण्यागोविंदाने राहू.
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments