खरंच मला कळलेच नाही. मला तु आवडत होतास, की तु हसलास की गालावर पडणारी खळी आवडायची? खरंच मला कळलेच नाही. बहुतेक तरी मला तुझी गालावरची खळी आवडायची कारण ती कायम तुझ्या सोबत असायची. मला त्या खळीचा खूप हेवा वाटायचा कारण कायम प्रत्येक क्षणी ती तुझ्या सोबत असायची आणि मी??……… जाऊ देत मला बघून तुझ्या मनात कळी फुलायची की नाही माहिती नाही पण तुला बघून माझ्या मनात नक्कीच कळी फुलायची मग ती इतकी फुलायची की तुझे विचार, आपल्या भेटी आणि तुझी ती गोड खळी या सगळ्यांनी माझे मन इतके व्यापून जायचे, की मग तु समोर नसताना सुद्धा तुलाच पाहत बसायचे. आणि ह्या सगळ्यात वेळ कसा निघून जायचा कळायचेच नाही. हे सगळ तुला सांगाव म्हटल, बराच प्रयत्न पण केला; नंतर म्हटल राहू द्याव. कदाचित तुला हे आवडणार नाही. तु माझ्याशी बोलणार नाही; आणि मग मला ती गोड खळी पाहता येणार नाही. जिच्यावर मी प्रेम केलं. खरचं मी तुझ्यापेक्षा जास्त त्या खळीवर प्रेम केल. आणि त्या खळीकडे पाहता पाहता पुन्हा तुझ्याकडे पहायचं राहून गेलं………

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Akshay Pund

Mast lihile aahes Samruddhi.. Keep it up..