भावनांचा आज त्यांनी
मांडला बाजार आहे
सर्व आहे भरभरूनि
पण भावनाशून्य आहे

भाव नाही अंतरी पण
तो दिखावा कोण आहे
अर्थ उमगेना स्वतःला
कौतुकाची खोड आहे

भावनांचा जन्म पहिला
शब्द हा तर अनुज आहे
भाव नसता जन्मलेला
शब्द कवडीमोल आहे

जर मनीचे त्या मनाला
सांगण्याची ओढ आहे
श्रोतृगण पुसता कशाला
जर समर्पित भाव आहे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments