व्यावसायीकांना पेंशन मिळणार, शेतकऱ्यांची कर्जे माफ होणार, राजकारण्यांची पगार वाढ होणार. पण सामान्य करदात्याचे काय?

सकाळी १० ते ६ काम करायचे. संध्याकाळी संसारीक वाद त्या नंतर जमलेच तर थोडी झोप. पण तिही किती मिळेल माहित नाही कारण रात्रीच्या अंधारात डोळ्यासमोर नाचणारा उद्याचा दिवस. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज, स्वतःचे एक छोटेका होईना पण एक छप्पर असावे म्हणून तुकड्या तुकड्यात घेतलेले लाखोंचे गृहकर्ज. म्हातार्पणाची काठी म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज. अश्या कर्जाचा द्रोणागिरी डोक्यावर घेऊन हसरा मुखवटा चढवणारा अतिसामान्य करदाता.
हो हाच मी करदाता आज जेंव्हा मी कर भरतो तेंव्हाच ही अर्थव्यवस्था सुरळीत चालते. पण जेंव्हा माझ्या कर्जातून ईतरांची कर्जे माफ होतात तेंव्हा जिव तुटतो हो. कारण जेंव्हा हेच कर्जमाफी घेऊन एखादी चारचाकी गाडी समोर मिरवतात तेंव्हा सामान्य माणूस किती लाचार आहे हे कळतं. जेंव्हा एखादा शेतकरी एखादा व्यावसायिक कर्जामुळे आत्महत्या करतात तेंव्हा सर्व प्रसारमाध्यमे गोळा होतात. पण माझ्या सारखा एखादा गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज तसेच अन्य कर्ज काही कारणांमुळे भरू शकला नाही आणि जर त्यानी आत्महत्या केली तर त्याचे कोणला काही नसते. ज्या प्रमाणे शेतकरी आपले सर्वस्व लावून धान्य पिकवतो त्याचे पुर्ण भविष्य हे त्याने केलेल्या पेरणी वर अवलंबून असते. आणि त्याचे हे हातचे पिक नैसर्गिक आपत्ती मुळे खराब झाले तर शासन त्याचे कर्ज माफ करते पण जेंव्हा एखादा नोकरदार आपले सर्वस्व आपल्या एकुलत्याएक मुलावर लावतो पण जर त्यालाच काही झाले तर या करदात्याचे काय? शेतकरी अथवा व्यावसायिक एका तोट्यातून स्वतःला सावरूशकतो पण माझ्या सारख्याचे काय. आम्हाला तर केवळ एकच संधी मिळते आमचे भवीष्य घडवायची.
क्रमशः

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments