कवितेतला कवी मी

छंद वगैरे नाही मुळात
प्रेम वगैरे सारे मनात
मी फक्त कविता करतो
शब्दांमध्ये रोज रमतो

बदलण्या मधला मी नाही
जरी बदलले असे काही
ठरले ईचकेच सारे माझे
जरी ठरवण्या मी तयार नाही

धुंद रमलो रंगात साऱ्या
नशा अशी ही शब्दात माझ्या
प्रेमगीत जरी लिहतो मी
प्रेम नसे जगात माझ्या

रोजचेच ते शब्द सारे
भाव जरी हे गुंतले आज
भाव सारे अन भावनाच या
कवितेत सारे सजले आज

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments