राग

राग
राग म्हणजे नुसतीच धगधगनारी आग
राग म्हणजे नुसतीच धगधगनारी आग..
ज्यात आधी जाळून मीच खाक
ज्यात आधी जाळून मीच खाक..
आहांकर तरी जाळायचा तो किती भरभरून पडलाय अति…
रागातल्या विचारांचा गाडीला आता कसला ब्रेक
चिती द्वेष मनि आक्रोश विचारात हि कलेश
चिती द्वेष मनि आक्रोश विचारात हि कलेश…
आठवून शब्द उगाळून दुःख मन अता खिन्न मन अता खिन्न.
राग हि आपल्यावर.. संताप हि स्वतःवर…नियंत्रण नाही विचारांवर….मग कसा हा राग दुसऱ्यावर…
राग लावे चांगुलपणाला आग, पाडे शंकेला भाग.
विसरून गोडी करून कुरघोडी कशी मिटेल आपल्यातली हि दरी .
मग रुसवे, फुगवे ,वाद व तंटे करुनी शेवटी मन धुमसे आतल्याआत ..मन धुमसे आतल्याआत….
ज्याच्यावर मी मनापासून धरलाय राग देवजाने आहे का त्याला जरा तरी ह्या रागाची आच ह्या रागाची आच…

राग माझा खरंच का इतका खास
मीच द्यावे माझ्या जिव्हास त्रास
नको आता ह्या हल्लक आठवणींचा सहवास…

माफ केला मी स्वतःला राग केल्या बद्दल स्वतःवर
माफ केले मी स्वतःला राग केल्या बद्दल स्वतःवर
माफ केला मी तुला आणि आपल्यातल्या चुकीला ….
माफ केला मी तुला आणि
आपल्यातल्या चुकीला ….
आनंद माझा मी आता जप्तिये अपार
आनंद माझा मी आता जप्तीये अपार
नाही भावनांचा आता मांडत व्यापार
स्वतःशीच रागाची वेस मी आता अखलिये
स्वतःशीच रागाची वेस मी आता अखलिये
माझ्याच सुखाची जवाबदारी मी मनापासून घेतलीये
मलाच मी पून्हाने भेटलिये… मालाच मी पुन्हाने भेटलीये

सौ प्राची किरण गोळे

प्राची गोळे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments