महाराष्ट्र दिन

मंगल देशा !
पवित्र देशा !
महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा ! महाराष्ट्र देशा !

कसं हाय मंडळी झाक हाय न्हव ? असणारच म्हना..! अव आज १ मे महाराष्ट्र दिन न्हव का ! आजच्याला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
आजचा दिस कामगार दिस म्हनुन बी साजरा होतूय. तुम्हासनी ये ठाव हाय काय, पहिला यो भाग देवगिरी म्हनुन लय प्रसिद्ध व्हता ते, या दिसाची १९६० साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी मुहूर्त मेढ रोवली व यशवंत राव चव्हाण यांच्या हाती या राज्याची जबाबदारी सोपवली.

संत निवृत्ती, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाळी, नामदेव, समर्थ रामदास चक्रधर यांनी मराठीचे माधुर्य आपल्या अभंगातून मांडले. अव् येव्हढच नाय तर एस.एम जोशी, कुसुमाग्रज , वसंत बापट,गोविंदाग्रज ,श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्र गीते लिहून आपल्या मातीचा व राज्ज्यचा आभिमान जागवला. प्र.के.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे हे नवं महाराष्ट्रास साठी एक झाले व राज्याचे पोषण, संवर्धन केले. महाराष्ट्र म्हनल की आपल्या छत्रपती शिवाजी राजास इसरून कसं चालल. अव राजापासूनच प्रेरणा घिवून महाराष्ट्रातील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरू, नाना पाटील, उमाजी नाईक यांसारख्या क्रांतिवीरांनी अतोनात कष्ट ,यातना सहन केल्या. या साठी त्यांनी प्रणांचीही पर्वा केली नाही म्हणून आजचा दिस त्यांच्या आठवणी शिवाय कसा काय जाईल…

म्हनुन या कामगार दिना दिशी आस्सल म्हराठ मोळ्या जेवणाचा बेत मी करतीय. तुमी बी करा.. माजा कडं तर आक्षी गावरान बेत हाय.झुणका, भाकर अन् ठेचा त्योबी लवंगी मिरचीचा हाय . सुटल न्हव तोंडाला पानी? मंग, कसं वाटलं? झाक वाटल असल तर सांगा बरं का ,मी असच काय बाय लिहीत असती.

चला तर मंग तुम्हाला बी महाराष्ट्र दिनाच्या लय लय शुभेछा बरं का.

जय महाराष्ट्र..

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments