आई

आई
आई ही असते कधी मम्मी
कधी कुठे असते ती माय,
माँ अथवा असो अम्मी
ती तर दुधावरची साय.
लहानपणापासून आपली
आईच आवडती शेफ,
कुठलाही पदार्थ आवडतो
करो चकली, चिवडा वा केक.
अनपेक्षित आपल्या तोंडून
पहिला शब्द निघतो तो आई,
जीवनातल्या प्रत्येक उणिवांची
करत असते ती भरपाई.
नऊ महिने पोटात ठेवून
जपते आपल्या सर्वांना,
पहिला शिक्षक म्हणून चालना देते
पुढील आपल्या सर्व कर्मांना.
ममता, करुणा आणि नेहमी
ओतप्रोत भरलेले प्रेम,
अशा पुज्यनिय माऊलीला
माझे सादर प्रणाम सप्रेम !
“कविमोल” अमोल बारई

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments