बापाच्या आयुष्याची सहल

बापाच्या आयुष्याची सहल

एक छोटेसे गाव होते आणि तेथे एक कुटुंब राहत होते

शेतकरी बाप होता पण मेहनती होता काबाड कष्ट करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता बाप खूप कष्टाळू होता मुलांना काही कमी पडू नये याची खूप काळजी घेत होता.

एकदा मुलाच्या शाळेची सहल ठरते

सर्व मुलांना सांगितले जाते की सहलीला सर्वांना यायचे आहे शेतकऱ्याच्या मुलगा ही घरी सांगतो मला सहलीला जायचे आहे .बापाला प्रश्न पडतो सहलीला पैसे आणायचे कुठून बाप खूप विचार करतो आणि मुलाला गावाला पाठवून देतो मुलगाही हसत गावाला जातो पण दोन चार दिवसात त्याला सहली ला जाणारे मुले डोळ्यासमोर दिसू लागतात तो परत आपल्या गावी येतो पुन्हा शाळेत जाऊ लागतो

शाळेत पुन्हा मुले त्याला सांगता आम्ही सर्व जण जातोय तू का येत नाही मुलगा घरी जातो वडिलांना सांगतो मला सहलीला जायचे आहे म्हणजे जायचे आहे.

वडील खुप विचार करता आणि मुलाला हो म्हणता

बापाच्या आयुष्याची सहल भाग – 2

वडील विचार करू लागता मुलाला तर हो म्हटलंय पण पैसे आणायचे कुठून दिवस भर गावात फिरता पण पैसे काही मिळत नाही इकडे मुलगा खुप खुश असतो की बाबा मला सहलीला पाठवत आहे सर्व शाळेत सांगत फिरतो मी पण येणार आहे सहलीला माझे बाबा भरणार आहे पैसे

हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात आसव येतात

😢😢

बापाचा अभिमान ही वाटत असतो मुलाला माझा बाबा किती चांगला आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि तेवढ्यात त्याला बाबा शाळेत येताना दिसतो

मुलगा अलगद जाऊन बाबाला मिठी मारतो बाबा पैसे भरायला आले ना तुम्ही मला माहिती तुम्ही पैसेच भरायला आले असणार

बाबा अलगद मुलाला कडेवर घेतो अरे हो रे बाळा मी पैसे भरायला आलोय तुझ्या सहलीचे मुलाला जग जिंकल्या सारखे झाले असते

वडिलांना ही मुला कडे बघून भरून येते

एवढ्याश्या जीवाचा आनंद बघून बापाच्या डोळ्यात अलगद आनंदाश्रू यायला लागता

मुलाला सोबत घेऊन बाबा सहलीचे पैसे जमा करतात आणि घरी जायला निघतात

बाबांना जाताना बघून मुलगा विचार करू लागतो की बाबांनी पैसे कुठून आणले असतील आणि कसे आणले असतील पण तेवढ्यात शाळेतील बाकी मुले त्याला आवाज देऊ लागतात आणि मग मुलगा वर्गात निघून जातो .

वर्गात बसल्यावर त्याच्या मनात सहलीचा दिवस उभा राहतो सहलीची ती बस त्याला दिसू लागते , त्याला सहलीला सोडायला आलेला बाबा त्याला दिसू लागतो

बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मनातल्या मनात देवाला म्हणू लागतो हाच बाबा मला प्रत्येक जन्मो जन्मी मिळू दे

परिस्थिती नसतांना सुध्दा त्याने माझे सहलीची पैसे भरले. तेवढ्यात वर्गशिक्षिका येतात आणि डोळ्यासमोरून सहलीची ती बस नाहीशी होते

मुलगा शाळा सुटण्याची वाट बघत असतो त्याला केव्हा घरी जाईन आणि केव्हा नाही असे झाले असते

शाळा सुटली तसा तो घरी जायला निघाला वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला तो सहलीला जाणार आहे हे सांगायचे मात्र विसरत नव्हता घरी पोहचताच त्याने आईला सांगितले अग आई बाबा आले होते आज शाळेत आणि माझे पैसे पण भरले त्यांनी सहलीचे पण आई मला सांग ना त्यांनी पैसे कुठून आणले ?

काय केले बाबाने की त्यांना पैसे मिळाले आई मात्र मान हलवून फक्त तुला सहलीला जायला मिळतेय ना मग का एवढा विचार करतोय एवढेच म्हणाली मुलाच्या मनातून पैसे कुठून आले हे मात्र काही जाता जात नव्हते

पैशांचा विचार करत मुलगा अभ्यासाला बसला काही वेळानंतर बाबा पण घरी येतात.

मुलाला अभ्यासाला बसलेल्या बघून हळुवार डोक्यावरून हात फिरवत बाबा स्वयंपाक घरा कडे जाऊ लागतात आत आई बाबांना बघून चुलीवर चहा ठेवू लागते

चहा घेत असताना आई हळूच बाबांना विचारते अहो पैसे कुठून आणले मुलाच्या कानावर ते शब्द पडताच त्याचे सर्व लक्ष बाबांच्या बोलण्यावर तो केंद्रित करू लागतो

बाबा आईला सांगू लागतात अग पैश्यांचे काय घेऊन बसलीस तू आधी हे सहलीचे पैसे भरल्यानंतर उरलेले पैसे घे आपल्या बाळाला त्यातले काही पैसे सहलीच्या खर्चाला दे आणि उरलेल्या पैश्यांचे थोडे दुकानातून मुरमुरे घेऊन त्याला मस्त चिवडा बनवून दे मुलगा हे सर्व ऐकत होता त्याला बाबांचा खूप अभिमान वाटू लागला होता

पुढे बाबा त्याच्या आईला सांगू लागले मागच्या वर्षी भाषणात त्याने भाग घेतला होता त्याचे भाषण मी शाळेच्या ओट्यावर बसून ऐकले होते त्याला मिळालेले प्रथम बक्षीस बघून छाती अशी फुलून गेली होती म्हणून ठरवले पोराला काही कमी पडू द्यायचे नाही इकडे डोळे पुसत मुलगा हे सर्व ऐकत होता.

बाबा पुढे सांगू लागला अग तू विचारत होती ना सहली ला पैसे कुठून आले काल दिवस भर गावात फिर फिर फिरलो पण पैसे काही भेटले नाही मग असाच पारावर बसलो विचार करत

आपल्या मुलाला आपण साधे सहलीला पाठवू शकत नाही मी एक बाप म्हणून काय करू शकत नाही आणि तेवढ्यात मास्तर समोरून आले म्हणू लागले काय रे गड्या काय विचार करत बसला एकटाच

काही नाही मास्तर बसलो एकटाच ..

तेवढ्यात मास्तर म्हटले काही अडचण आहे का मी म्हटलो मास्तर नाही हो (शेवटी काही असो पण माझ्यातला बापाचा आत्मसन्मान अजून जिवंत होता)

काही काम असेल तर सांगा ना कामाची गरज आहे हो खूप मला

मग मास्तर म्हटले काम तर माझ्या कडे काही नाही पण काल तालुक्याला गेलो होतो तिथे माझे नातेवाईक राहता त्यांच्या कडे एक काम आहे करशील का तू ?

मग हसत उठलो बोला ना मास्तर काम काही असो करेन हो मी आणि मग त्यांनी सांगितले की नातेवाईकांच्या घरी पाण्याची खूप समस्या आहे आणि त्यांच्या घरी असलेल्या विहीर मध्ये खूप गाळ झालाय तुला तो गाळ तेवढा काढायचा आहे बोल जमत असेल तर सांग मग

मी लगेच हो म्हटलो आणि मग मास्तर ने ते पैसे दिले मला

आता मात्र मुला कडून राहिले गेले नाही त्याने ताडकड उठून बापाला

मिठी मारली आणि रडू लागला बाबा खरच हो तुम्ही खूप महान आहात

बाबा पुढे बोलू लागला अरे बघ परवा तुझी सहल जाईन म्हणून मी उद्याच तालुक्याला जाऊन तेवढे काम करून येतो ..

अभ्यास झाल्यानंतर मुलगा आता बाबांशी गप्पा मारू लागला बाबांना विचारू लागला बाबा तुम्हाला मी मोठा होऊन काय व्हावे अशी इच्छा आहे

बाबा म्हटला तू खूप शिक मोठा माणूस हो पण अडल्या नडल्या ला मदत करायला मात्र विसरू नको हो बाबा तुम्ही माझ्या साठी एवढे करताय मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेऊन अभ्यास करेन आणि मग मुलगा झोपून जातो

सकाळी सकाळी बाबा मुलाला उठवून म्हणता बाळा मी तालुक्याला जातोय काम उरकून येईल सायंकाळ पर्यंत बाबांची पाठमोरी बाजू बघत मुलगा त्यांच्या कडे बघतच राहिला आणि बाबा निघून गेले

एव्हाना मुलाला ही शाळेत जायचे होते कारण आज सहलीच्या सर्व सूचना दिल्या जाणार होत्या

मग मुलगाही शाळेत निघतो

मुलाच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसून येत होता शिक्षक मुलाला म्हटले तू खूपच उत्साही झालेला दिसतोय सहलीसाठी हो सर मी पहिल्यांदा कुठे सहलीला जातोय म्हणून मला एवढा आनंद झाला आहे एवढे शिक्षक बोलत असताना एक मुलगी मुलाला बोलावण्यासाठी वर्गात येते आणि शिक्षकांना सांगते की मुलाच्या वडिलांची तब्येत बिघडलीय त्याला घरी बोलावले

मुलगा तसाच उठला आणि घराकडे पळू लागला त्याला घराकडे जाणारे अंतर खूप दूर वाटू लागले होते घरी पोहचून बघतो तर त्याची आई तालुक्याला निघून गेली होती घराजवळ खूप गर्दी जमली होती मुलगा हे बघुन गोंधळला आणि रडायला लागला मुलाला काही कळेना काय झाले आणि मग एका माणूस पुढे येऊन त्याला सांगू लागला अरे तुझे बाबा विहिरीतला गाळ काढत असताना फसले रे त्यांना नाही वाचवता आले आणि हे ऐकून मुलासाठी सर्व जग थांबल्या सारखे वाटले त्याला सकाळी जाणारा बाप दिसू लागला सकाळी बाबा काय सांगून गेले होते ते त्याला आठवायला लागले त्या बाबांची सायंकाळी घरी येण्याची तळमळ त्याला आठवू लागली आणि शेवटी मुलाची सहल बापाच्या आयुष्याची शेवटची सहल झाली होती😭😭

Sachin salunke

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
प्रवीण

ह्रदयस्पर्शी