भारतीय सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध व महत्वाचा सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली

दीप म्हणजे दिवा व आवली म्हणजे ओळ किंवा मालिका अशी दिव्याची ओळ किंवा मालिका म्हणजे दीपावली. 🪔

प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा.अंधार म्हणजे नकारात्मकता घालवून सकारात्मकतेचा प्रकाश आणणारा हा उत्सव .दिवाळी चे धार्मिक महत्त्व हे हिंदू तत्वज्ञान ,प्रादेशिक मिथिक, दंत कथा व श्रध्दा यावर अवलंबुन आहे . अश्विन संपून कार्तिक सुरू होतो त्यामुळे नुकतीच थंडीची चाहूल लागलेली असते. शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते . पावसाळ्यातील पूर , शेतकऱ्याची शेतीची कामं , निकृष्ट भाजी पाला यामुळे छोटे मोठे आजार होऊन गेलेले असतात. त्यामुळे शरीराची हानी होते . तेव्हा तळणीचे पदार्थ खर तर खायचे नसतात पण आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते खातो व पोट बिघडवून घेतो . म्हणून आपल्या पूर्वज्यानी कधी काय खावे हे सांगितले आहे .आरोग्याचे जतन हाच मुख्य उद्देश आपल्या पूर्वजांनी डोळ्यासमोर ठेऊन सण व उत्सवांची योजना केली आहे . आपल्या साणांचा संबंध खाद्य संस्कृतिशी आहे पण फक्त खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतू बदला मुळे काही आजार या काळात उद्भवतात, याला प्रतिबंध म्हणून त्या त्या ऋतूत तो तो आहार घेणं फायदेशीर असत . दिवाळी हा सण आश्विन संपताना व कार्तिक सुरू होताना येतो. निसर्ग सौंदर्याच्या आविष्काराचा व धान्याच्या संपंन्नतेचा हा काळ असतो . या दिवसात निरोगी वातावरण ,धन धान्याची मुबलकता असल्याने बळ,ऊर्जा देणाऱ्या आहाराचे सेवन करण्याचा विचार पूर्वजांनी केला असावा . थंडी मधे या आहाराचे सेवन केल्याने हे अन्न चरबीच्या रुपात शरीरात साठते व पुढे उन्हाळा सुरू होणार असतो, तेव्हा आपल्याला नेहमी सारखे काही खावेसे वाटतं नाही त्या मुळे पुरेसे अन्न पोटात जात नाही. उष्णतेमुळे नुसते पाणी पाणी होते तेव्हा आणि काही ठिकाणी जेव्हा अन्नाचे दुर्भिक्ष असते तेव्हा शरीर या साठलेल्या चरबीचा उपयोग करते. यासाठीच आपण थंडीत डिंकाचे लाडू, आळीव,खोबरं , ड्रायफ्रूट अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करतो . आणि म्हणूनच या दिवसात येणाऱ्या दिवाळीत असे तळलेले, स्निग्ध , पौष्टिक पदार्थांचा फराळ आपण करतो .अशा फराळाला १००० वर्षाची परंपरा आहे . दिवाळी सणाचा इतिहास पुराण काळाच्या ही मागे जाऊन पोहोचतो .उपनिषद काळात पार्वण , आश्वयुजी व आग्रयण हे यज्ञ होत यज्ञात नवीन आलेल्या भाताचे प्रकार म्हणजे पोहे व पोहया चे पदार्थ, खीर हे पदार्थ बनवले जात पुढे या तिन्ही यज्ञांचे एकत्रीकरणं होऊन ज्याला आपण दिवाळी किंवा दीपावली म्हणतो तो सण अस्तित्वात आला असे प्रसिद्ध अभ्यासक ऋग्वेदी सांगतात . दिवाळी हा सण हिंदू , जैन व शीख हे विविध ऐतिहासिक घटना यांची साक्ष म्हणून साजरी करतात . नेपाळ मधे ही हा सण साजरा होतो .

फराळ

प्राचीन काळी ख्रिस्त पूर्व चौथ्या शतकात भारतीय शल्य चिकित्सक सुश्रुत हे शस्त्र क्रिया झालेल्या रुग्णांना मध ,गूळ , तीळ तांचे मिश्रण देत पुढे याचे प्रमाण निश्चित करून त्याचा गोळा तयार करत .हेच आत्ताचे लाडू .नंतर त्यात आवडीचे पदार्थ घालून आपण आत्ता वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करतो . पर्शियन आक्रमणा नंतर लाडू ला शाही दिवस आले .

बुंदी ही मूळची राजस्थानची

मुरुक्कु ,चक्रिका , चाकुली या नावाने ओळखली जाणारी आत्ताची चकली ही दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली .श्री लंका , सिंगापूर ,मलेशिया या देशात ही चाक्रिका आढळते .

शश्कुली ( करंजी ) ही महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातून आली.

उत्तर प्रदेश ,राजस्थान ,गुजरात ,महाराष्ट्र असा प्रवास करून ती मराठी घरात पोहोचली. उत्तर प्रदेशात तिला गुजिया म्हणतात छत्तीसगड मधे कुसली ,गुजरात मधे घुघरा ,बिहार मधे पुरुकिया / पेडकिया म्हणतात .

अनारसा हे फक्त दोनच राज्यात आढलतात एक महाराष्ट्र व दुसरा बिहार बिहार मधे अनारशाला मानाचे स्थान आहे .

फराळा मधील विविध खाद्य पदर्थांचे उल्लेख क्षेम कुतूहल ,भोजन कुतूहल इत्यादी पाकशास्त्र विषयक ग्रंथात आहेत . या ग्रंथात शापुप ( घारगे , आप्पे ) ,अपुप ( अनारसे ) , शंखपाला ( शंकर पाळे ) , संपाव ( साटोरी ) , मधू शीर्षक ( खाजे ) , शष्कुली ( करंजी ) , चणक पुरिका ( बेसनाच्या तिखट पुऱ्या ) , मुदग् लड्डू ( मुगाचे लाडू ) , सेविका ( शेवया ) चक्रीका ( चकली ) इत्यादींचा उल्लेख आहे . १६ व्या शतकात जगाच्या सफरीवर निघालेले युरोपीय व्यापारी आपल्याबरोबर तिथली पांढरी साखर , गव्हाचे रीफाईड पीठ म्हणजे मैदा व पॉलीशचा पांढरा तांदूळ घेऊन आले व याचीच नंतर सर्व जगाला भुरळ पडली . काही काही पदार्थ फराळा तून नामशेष झाले म्हणून त्या पदार्थांचा आत्ताच्या फराळात समावेश नाही जसे की

ढेबऱ्या – तांदळाचे पीठ+गूळ+तूप व तळण्यासाठी तेल या मिश्रणा च्या पुऱ्या तळत किंवा खरपूस भाकरी करत गणपती नंतर भात कापणीला सुरुवात होते व दिवाळीत नवीन धान्य घरी आल्यावर शेत मजुरांसाठी त्यांच्या हा आवडीचा पदार्थ आवर्जून केला जाई .

बोरं – तांदळाचं पीठ + गव्हाच पीठ +गूळ + तीळ व कच्च फोन चमचे तेल हे एकत्र घट्ट मळून त्याचे बोरा सारखे गोळे क व ते मंद तेलात तलायचे हा पदार्थ खूप कडक होत असे . त्या मुळे फक्त मुलं च हा पदार्थ खात. पण पुढे हा न आवडणारा पदार्थ फराळाच्या पदार्थातून नामशेष झाला . पण साटोरी , चंपाकळी , कडबोळी ,असे पूर्वी पासून असलेले काही काही पदार्थ आपण आज ही करतो.

फटाक्यांचा उल्लेख मात्र आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा ही चीन ची आहे फटक्यांच्या प्रचंड मोठ्या आवाजाने वाईट शक्ती जाते अशी त्यांची श्रद्धा.

आकाशदिवे 🪁

आश्विन शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या काळात सूर्यास्त झाला की घराच्या परिसरात आकाश दिवा लावतात या साठी यज्ञाला लागणारे उंच लाकूड घेऊन ते पुरतात त्या खांबावर / लाकडावर आठ पाकळ्या असलेला तिळाच्या तेलाचा दिवा लावतात या प्रत्येक पाकळीतील दिवा हा धर्म , हर ,भुती , दामोदर , धर्मराज , प्रजापती व अंधरातले पितर, प्रेत यासाठी असतो.

सुरवातीला आकाश कंदील मातीचा होता .छिद्र असलेल्या मातीच्या भांड्यात तुपाचा दिवा ठेवला जाई व हे भांडे उंच लाकडाला किंवा काठीला बांधले जाई.पृथ्वी ,जल ,अग्नी , वायू आणि आकाश ही पाच तत्व यालाच आपण पंचमहाभुत म्हणतो . पावसाळ्यात पावसाचे पडलेले पाणी जमिनीत मुरते. जमीन हे आप तत्व तर जमिनीत मुरलेले पाणी हे जल तत्व यातून काही निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते त्याला घरा बाहेर लवलेल्या आकाश कंदीलातील अग्नी तत्व समतोल करते अशी श्रद्धा आहे म्हणून घराबाहेर आकाश कंदील लावतात.

( वातस्यायना च्या ) कामसूत्र ग्रंथात या दिव्यांच्या रात्रीचा म्हणजे दिवाळीचा उल्लेख येतो .🪔
( काल विवेक ) ग्रंथात सुखरात्री म्हणून उल्लेख आहे .
( नीलमत पुराणात ) दीपमाला हा उल्लेख आहे .🪁
(ज्योतिष रत्न माला) या ग्रंथात दिवाळी हा उल्लेख येतो.
( भविशोत्तर ) पुराणात दीपालिका हा उल्लेख आहे.🪔

दिवाळीचं स्वरूप आता खूप बदलल आहे . दिवाळी म्हणली की खरेदी आलीच . प्रत्येक घर सजून , ताजे तवाने होऊन दिवाळीच्या स्वागताला सज्ज झालंय. शहरातल्या बाजारपेठा रंगी बेरंगी आकाश दिव्यांनी झगमगुन गेल्यात. विविध प्रकारच्या पणत्या, रांगोळ्या,यांनी दुकाने रंगीबेरंगी झालित. वासाची उटणे ,अत्तर ,यांनी पेठा सुगंधी झाल्यात .खरेदी साठी दुकाने माणसांनी नुसती फुलून आलीत. मिठाईची दुकाने विविध पदार्थांच्या वासाने मनाला व डोळ्याला तृप्त करतायत. रम्य शीतल पहाटे बागेत आसमंत प्रफुल्लित करणारे गाण्याचे स्वर येतायत. मातीचे किल्ले इवल्या इवल्या गवताने हिरवी गार झालेत. त्या वरचे मावळे जमवण्यासाठी छोट्यांची लगबग सुरू झालीय.
घराघरात गोड,तिखट अशा संमिश्र वासाने वातावरण खमंग झालंय.

मग अशा प्रसन्न आनंदी झगमगत्या दिवाळी साठी तुम्ही सज्ज आहात ना ?

उत्सव आला आनंदाचा,🪔
दिवस आनंद लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,

फुलांची तोरणं बांधू दारी,🪔
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण रंगांची,
नाती जपू मना मनाची,

येऊ दे घरी लक्ष्मी,🪔
धन धान्याच्या पावलांनी,
बरसुदे सुख,समृद्धी,
अगणित करांनी.

ही दिवाळी तुम्हाला आनंदाची ,समाधानाची, भरभराटीची व आरोग्य पूर्ण जाऊ दे 🪔

दिवाळीच्या तेजोमयी शुभेच्छा.🪔

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments