कोजागिरी

आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात . भारतीय हिंदू संस्कृतीतील हा एक महत्त्वाचा दिवस . या पौर्णिमेला माणिकेथारी म्हणजेच ( शिंपल्यात मोती ) तयार करणारी पौर्णिमा म्हणतात शिवाय कौमुदी पौर्णिमा , माडी पौर्णिमा , शरद पौर्णिमा , अशी अनेक नावे आहेत बंगाल मधे कोजागिरी पौर्णिमेला लोखखी पौर्णिमा म्हणतात . या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो त्या मुळे त्याची शीतल सात्विक किरणे पृथ्वीवर सर्वात जास्त पडलेली असतात ती खूप आरोग्यदायी असतात . त्यात शरद ऋतूही सुरू असतो तया मुळे हवामानात खूप बदल होत असतात म्हणूनच या दिवशी मध्यरात्री बारा वाजता चंद्र प्रकशात पौष्टिक असे बदाम,पिस्ते ,केशर ,वेलदोडे घातलेले आटीव दूध 🥛पिण्याचा प्रघात आहे . अशा दूधात चंद्र किरणे पडल्याने असे दूध अमृता समान होते .ते पिण्याने पित्त प्रकोप कमी होतो .दमा,अस्थमा यावर असे दूध हे एक रामबाण औषध असते असे आयुर्वेदात सांगितले आहे .यावेळी देवीची भजने ,गाणी म्हणून फेर धरतात , बागा , उद्याने, रस्ते,मैदाने ,मंदिरे ,घरे या ठिकाणी लक्ष्मीच्या स्वागतासाठी असंख्य दिव्यांची 🪔रोषणाई करतात . या दिवशी मधरात्री स्वर्गातून साक्षात लक्ष्मी देवी हातात अमृत कुंभ घेऊन पृथ्वीवर अवतरते . व “को जगर्ती ,को जागर्ती ” म्हणजेच कोण जागे आहे कोण जागे आहे म्हणत जागे असणाऱ्यांना म्हणजेच जे साधक आहेत . संयमी आहेत त्यांना समृद्धी,आरोग्य, धन अमृत तत्व बहाल करते .

या निशा सर्व भुतानां तस्या जागर्ती संयमी,
यस्या जाग्रती भूतानी सा निशा पष्यतो मुने :

“को जागर्ती “चा पुढे अपभ्रश होऊन कोजागिरी असं म्हणंल जातं. शरद पौर्णिमा हा लक्ष्मी मातेचा जन्म दिवस म्हणून ही समजतात .कारण याच दिवशी समुद्र मंथनातून अमृत कुंभ घेऊन श्री लक्ष्मी प्रगट झाली होती . अशा या शरद पौर्णिमेला च भगवान श्री कृष्णाने आपल्या प्रिय गोपिकांबरोबर महा रासलीला केली होती . खरं तर कोजागिरी हे एक व्रत आहे . दिवस भर उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतरूढ इंद्राची पूजा करतात . काही लोक मातीच्या किंवा धातूच्या कलशावर लक्षुमीची प्रतिमा वस्त्राने झाकून पूजा करतात संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर दिवा लावून पुजा करतात . देवीला दूध साखर किंवा खिरीचा नेवेद्य अर्पण करून ती चंद्र प्रकशात ठेवतात व नंतर प्रसाद म्हणून प्राशन करतात . ग्रामीण भागात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे . या दिवसात तांदूळ , वरी ,नाचणी इत्यादी नवीन धान्य यायला सुरुवात होते .शिवाय विविध फळे , फुले ,धान्य व भाज्यांची ही रेलचेल असते हीच खरी शेतकऱ्यांची लक्ष्मी असते म्हणून ही पौर्णिमा शेतकरी मोठ्या आनंदाने साजरी करतात . आधी धान्याची पूजा करून घरच्या दारावर नवीन आलेल्या धान्याच्या ओंब्या 🌾 फुलं ,एकत्र बांधून ठेवतात . नवीन तांदळाचा भात , तांदळाच्या आंबोळ्या, पातोळे यांचा नेवेद्य करतात याला नवांन्न पौर्णिमा असे म्हणतात . या दिवशी घरातील ज्येष्ठ मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना औक्षण करून अश्विनी साजरी करतात . अशी ही आरोग्य पूर्ण कोजागिरी आपण साजरी करू या

विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे

असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे

चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागिरी करा रे

कोजागिरी पौर्णमे च्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments