स्त्री आणि तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन

स्त्री आणि तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन……!

“स्त्री” म्हणलं की घर घराचा उंबरठा आणि मान मर्यादा यापलीकडे एखाद्या “स्त्री”चं अस्तित्व असूच नये आशा मागासलेल्या विचारांची माणसं आजच्या काळात देखील पहायला मिळतात…..!

कुठल्याही “स्त्री ” चा जन्म फक्त रांधा वाढा आणि उष्टी काढा यासाठीच झाला असावा का…..? जन्माला घालताना त्या विधात्याने देखील “स्त्री” ला तिच्या स्वतःच्या अस्तित्वावीणा जन्म दिलाय का…..? कधी आपण आशा प्रश्नांचा सखोलपणे विचार केलाय का……? नाही कारण का तर “स्त्री” ने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कधीच चालू नये हे वाक्य प्रत्येक स्त्री ने बालवयात असताना आपल्या आईच्याच तोंडून ऐकलं असावं मग त्या समाजात वावरत असणाऱ्या इतर अनोळखी लोकांकडून आणखी काय अपेक्षा ठेवतील…….!

आपणच तिला कधी समजून घेतलं नाही तिच्या मनाला आपुलकीने जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही नेहमीच तिला कमी लेखण्याचा प्रयत्न केला….! आपल्या घरातील “स्त्रिया” स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून स्वतःला घरकामातच झुगारून टाकावं…..! हीच आपली मानसिकता या मानसिकतेपलीकच्याही दृतिकोनातून पाहण्याचा आपण स्वतःहून कधी विचारही केला नाही…..! आणि जे असा विचार करू पाहतात स्त्रियांच्या समस्या सोडवू पाहतात आशा माणसाची मुद्दामहून पाय खेचली जातात…….!

खरच आशा निर्दयी लोकांसाठी “स्त्री” म्हणजे फक्त उपभोगाची वस्तू असावी……! पिढ्यानपिढ्या “स्त्री” च्या वेदना फक्त स्त्रियांनीच का समजून घ्यावे…..! कधीतरी पुरुषाने देखील आपल्या कठोर मनाला हळव्या मनाचं स्वरूप देऊन तिला आणि तिच्या वेदनेला जाणून घ्यावं……!

तिच्या पायतलं पैंजण इथे प्रत्येकाच्या नजरेस पडतं हो पण तीच्या मनाला बांधलेली कुविचारची बेडी का कोणाच्या नजरेस इथे दिसली नाही….! ती हसली हे दिसतं प्रत्येकाच्या नजरेला पण तिच्या मनाचं रडणं का कोणी पाहू शकतं नाही……!

तील सुद्धा मोकळ्या नभात स्वच्छंद मनाने फुलपाखरासारखं उडता यावे यासाठी आपणच आपल्या घरातील स्त्रियांना मोकळीक द्याला हवी……! तिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मोठ्या मनाने प्रोत्साहन दिले तरच “स्त्री” आणि तिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलू शकेल……!

©®★- @pavankumar_6958

Follow me on Instagram -http://www.instagram.com/pavankumar_6958

Pvnkumar_kamble

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments