संत माणकोजी बोधले

बाले घाटात धामणगाव आहे तिथे माणकोजी नावाचा क्षुद्र जातीत जन्मलेला एक वैष्णव रहात होता . तो श्रीमंत होता घरात अन्न धांन्या ला कमी न्हवती तो भगवत भक्त होता प्रत्येक एकादशीला तो पंढरीची वारी करायचा. एका वर्षी अस झालं की गावात भयंकर दुष्काळ पडला. अन्नधान्य खूप महागले त्या मुळे गोर गरीबांचे हाल होऊ लागले . हे पाहून माणकोजी अस्वस्थ झाला. त्याने गावात अन्नछत्र सुरू केले .तो पंढरपुरात ही दुष्काळ असल्याने असेच अन्नदान करू लागला. पण काही दिवसांनी त्याच्या जवळील धान्य संपले आता काय करायचं म्हणून कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मोल मजुरी करू लागला . पण काही असल तरी त्याची देवावरची निष्ठा कमी झाली नाही. तो नेहमी भजन कीर्तनात दंग असायचा . तेव्हा त्याचा दृढ भाव व निष्ठा पाहून देव त्याच्यावर प्रसन्न झाले . पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले . एकदा माणकोजी आषाढी वारी साठी पंढरपूरला निघाला मनात ब्राम्हण भोजन घालावे असे फार वाटत होते पण जवळ काहीच न्हवते . पण त्याचा निश्चय अटळ होता त्याने काय केलं जवळच्या जंगलातून लाकडे गोळा केली त्याची मोळी घेऊन पंढरपूरला आला बाजारात त्याने ही मोळी तीन पैशाला विकली . नंतर चंद्र भागेत स्नान करून तीन रुपयातील एक रुपया ब्राम्हणाला व एका रू हार,बुक्का विकत घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला गेला . त्या रात्री कीर्तन भजन ऐकून त्याने जागरण केले .
द्वादशिला ब्राम्हणाला शिधा द्यावा असे त्याच्या मनात होते पण एका पैशात काय येणार ? तो हिरमुसला त्याने त्या त्या पैशाचे अर्धा शेर पीठ घेतले आणि वाळवंटात बसला पण एवढेसे पीठ तरी कोण घेणार होते . हा त्याच्या मनातला भाव ओळखणार नाही तो देव कुठला ? त्या भक्त वच्छल पांडुरंगाने त्याचा भाव व तळमळ ओळखून एका गरीब ब्राम्हणांचे रुप घेतले . व भक्त मनोरथ पुरवण्यासाठी बसलेल्या माणकोजी जवळ जाऊन म्हणाला “मी असा दरिद्री दुर्बळ मला कोण विचारणार पण मला खूप भूक लागली आहे मला कोणीच काही देत नाही मी मोठ्या आशेने तुझ्या जवळ आलो आहे ” माणकोजी ला आनंद झाला पण तो म्हणाला महाराज या अल्प पिठाखेरिज माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही ” असे म्हणून लाजत त्याने ते पीठ त्याला दिले . तेव्हा तो ब्राम्हण म्हणाला आता या पिठाचे मी इथेच पानगे करून खाईन पण माझे कुटुंब देवळात आहे व तिथे स्वयंपाक करायला जागा नाही तर तू असे कर विस्तव व गोवर्यांची व्यवस्था कर मी स्नान करून येतो .माणकोजीला खूप आनंद झाला मग त्याने तो ब्राम्हण स्नान करून येई पर्यंत विस्तव व गोवऱ्या आणून ठेवल्या . त्या नंतर ब्राम्हण वेशातील पांडुरंगाने ओलेत्यानेच पीठ मळायला घेतले . तेवढ्यात त्या ब्राह्मणाच्या बायकोचे रूप घेऊन रुख्मिणी ही तिथे आली . आणि पतीला उद्देशून म्हणली ” “नाथ हे काय यजमान दिसले म्हणून तुम्ही एकटेच आलात ? पण आता थांबा मी आंघोळ करून तुम्हाला स्वयंपाक करून घालते ” त्या नंतर ती स्नान करून आली व स्वयंपाक करू लागली. त्या दिवशी द्वादशीला सवाश्ण व ब्राम्हण हे दोन्हीही मिळाल्याने मणाकोजिला अत्यानंद झाला.पण त्याच वेळी एवढेसे पीठ दोघांना कसे पुरणार म्हणून काळजी वाटली .खरतर द्वादशीला पंच पक्वान्न करावे असे रुक्मिणीला वाटतं होते . पण माणकोजीला वाईट वाटले असते म्हणून तिने तेव्हढ्याच पिठात बरेच पनगे भाजले.तिने तीन पाने जेवायला घेतल्यावर माणकोजी म्हणले तुम्ही अतिथी आहात त्या मुळे तुंम्ही जेवल्यावर मी तुमचे उचिष्ट प्रसाद म्हणून घेईन .त्या प्रमाणे ते दोघे जेवले व उरलेले अन्न माणकोजीस देऊन दोघे अदृश्य झाले .माणकोजी त्यांना सगळी कडे शोधू लागला आता त्याला कळून चुकले आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः देव आले होते . त्याने तो प्रसाद खाल्ला व थेट देवळात देवा समोर उभा राहिला . डोळ्यातल पाणी थांबायचं नाव घेत न्हवत तो देवाला म्हणतात ” देवा इथलं पंचपक्वान्न सोडून तू माझ्या साठी पानग्या खायला आलास ? तूला आणि रुख्मिणी मातेला माझ्या साठी यावे लागले,पानग्या कराव्या लागल्या . देवा माफ कर .यावर देव त्याला म्हणाले “अरे माणकोजी मी सहस्त्रभोजना ही जातो पण मला तिथे कुणी प्रेमाने मायेने बोलवत नाही रे . हे मी उद्या तुला दाखवून देतो” . झालं दुसऱ्या दिवशी एका श्रीमंत ब्राम्हणा कडे सहस्त्र भोजन होते . मोठा मंडप टाकला होता विविध पदार्थ होते . देवा जवळ नेवेद्याने भरलेले ताट ही होते . पाने मांडली गेली ब्राम्हण जेवायला बसले तेवढ्यात एका गरीब ब्राम्हणांचे रुप घेऊन देव तेथे गेले . या मळकट दरिद्री ब्राम्हणाला पाहून यजमान संतापले . त्याला हाकलून दिले तरीही हो ब्राम्हण त्यांना न जुमानता तटावर जाऊन बसला . मला खूप भूक लागली आहे मला थोडेसे तरी द्या असे विनवू लागला आता मात्र यजमानाने त्याला हाताला धरून बाहेर काढले. त्याच्या नोकरांनी त्याला पार वाळवंटात नेऊन टाकले . इतक्यात जोराचा वारा सुटला व मंडप उडून गेला सगळ्या अन्नावर धूळ उडाली.पत्रे ही उडून गेले . जेवायला बसलेले उपाशीच उठले सगळे निवाऱ्यासाठी पळू लागले. तेव्हा पांडुरंग माणकोजी स म्हणाला यांची दांभिकता पाहिलीस का ? मी द्रौपदीकडे भाजीचे पान खाऊन व विदुरकडच्या कण्या खाऊन तृप्त झालो . सुदाम्याचे मूठभर पोहे व तुझे पानगे आनंदाने खाल्ले कारण तुमचा शुद्ध भाव. मला काही नको असते मला फक्त शुद्ध भाव व भक्ती हवी असते . माणकोजी ने देवाला नमस्कार केला व परत धामण गावला जायला निघाला . जाता जाता त्याला भूक व तहान लागली .देवाला माहीतच होते त्याने तो जायच्या वाटेत एक हिरवागार मळा उत्पन्न केला . माळ्याचे रुप घेऊन त्याची वाट पाहत बसला .तिथे माणकोजी येताच त्याला थांबवून देवाने त्याला पोटभर खाऊ पिऊ घातले . तृप्त झालेला माणकोजीने प्रेमाने त्या माळ्याला निरोप दिला . काही अंतर चालल्यावर त्याने सहज मागे पाहिले पण आता तिथे ना माळी होता ना मळा माणकोजी काय समजायचं ते समजला तेथूनच देवाला साष्टांग नमस्कार करत जड अंतक्करणाने तो जायला निघाला .

तर असा हा भक्त व त्याची भक्ती
आणि असहा भक्त सखा पांडुरंग .🙏🙏

पुंडलिका वर दे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जगत गुरू तुकाराम महाराज की जय
सर्व संत न की जय

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments