संत कान्होपात्रा

पंढरपूर जवळ मंगळवेढा या गावी शामा नावाची एक गणिका रहात होती . या शामा गणीके कडे तीच नाच गाणं ऐकायला,पाहायला प्रतिष्ठितांचे येणे जाणे होते .बरीच धनवान,उमराव,सावकार व मुस्लिम सरदार ही यायचे . त्यांना खुश करण्याचे काम ही गणिका करायची . पण चिखलात कमळ उगवावे तस हिच्या पोटी एका सुदंर लावण्यवती बलिकेने जन्म घेतला तीच ही कान्होपात्रा .कान्होपात्रा दिसायला तर सौंदर्य वती होतीच पण तिचा गळा ही खूप गोड होता . ती वयात आल्यावर हिनेही आपल्या प्रमाणे धनाढ्य लोकांना ,सरदारांना खुश ठेवावे व आपला व्यवसाय चालवावा असे आईला वाटत होते . पण पूर्व पुण्याईने कान्होपात्राला लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ होती . गावात कीर्तन प्रवचन ऐकण्यात व विठ्ठलाचं नामस्मरण करण्यात तिचा दिवस जात असे. ती गावकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला वारीला जात असे .त्या मुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असा विचारही तिच्या मनाला कधी शिवला नाही . वारीत तिला अनेक संत भेटत . एकदा वारी साठी पंढरपूर ला गेली असता तिला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचा सहवास मिळाला त्याने ती पुरती बदलली. आधीच धार्मिक होतीच, आता ती सतत विठ्ठलाच्या नामात दंग राहू लागली . कान्होपात्राच्या सौंदर्याची व आवाजाची ख्याती बिदरच्या बादशहा पर्यंत पोहोचली . तिला पकडुन आणण्यासाठी त्याने आपले सरदार पाठवले . आईला तर तिने आपला व्यवसाय करावा असेच वाटतं होते .आता आपले शिल आपल्यालाच वाचवायला हवे हे तिच्या लक्षात आले . वारीचे दिवस असल्याने ठिकठिकाणी गावागावात वारकरी दिसत होते . कान्होपात्राने आपले शील जपण्या साठी आपला वेश बदलला व ती वरकर्यांबरोबर पंढरपूरला आली. आता तोच तिचा वाली होता . ती तडक देवळात गेली व विठ्ठलाच्या पायावर डोके ठेऊन आपले रक्षण करण्याची विनवणी करू लागली.


पण कशी काय ती पंढरपूरला देवळात आहे ही बातमी सरदारांना लागली . ते तिच्या मागावरच असल्याने तिला शोधत शोधत देवळा बाहेरच थांबले . त्यांना पक्के माहीत होते की ती देवळातच आहे . देवळातल्या व्यवस्थापकांना तिला आपल्या हवाली करण्याचे त्यांनी फर्मावले .नाहीतर मंदिर उध्वस्त करण्याची धमकी ही दिली . आपले दैवत व मंदिर उध्वस्त होताना कान्होपात्रा कशी पाहू शकणार होती ? म्हणून तिने त्या यवनां बरोबर जाण्याची तयारी दर्शवली . पण फक्त एकदाच शेवटचे विठ्ठलाच्या पायावर डोके ठेऊ देण्याची विनंती केली. ती सरदारांनी मान्य केली . तिने आता विठ्ठलाच्या पायाला कडकडून मिठी मारली व त्याच क्षणी आपले प्राण विठ्ठलाच्या पायावर सोडले.

        नको देवराया, अंत आता पाहू
         प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे 

         हरिणीचे पाडस, व्याघ्ररे धरियेले
         मज लागी जाहले, तैसे देवा 

          तुजविण ठाव न, दिसे त्रिभुवनी
           धावे हो जननी , विठाबाई


            मोकलूनी आस, जाहले उदास 
            घेई कान्होपात्रेस, ह्रुदयात 

पण आपल्या व विठ्ठलाच्या भक्तीत अडसर आणणाऱ्या यवनांकडे ती गेली नाही.
मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ तिला पुरण्यात आलं. त्या ठिकाणी एक तारटी वृक्ष उगवला .आजही तो वृक्ष सतत हिरवा राहून कान्होपात्राच्या उत्कट भक्तीची साक्ष देत उभा आहे.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments