थोर संत नरसी मेहता

वैष्णव जन तो
तेने काहिये जो
पिर पराई जाणे रे

संत नरसिंह मेहतांना लोक नरसी मेहता म्हणूनच ओळखतात. यांचा जन्म गुजरात मधे तळजा या गावी सुमारे १४१४ साली झाला. घरची श्रीमंती असूनही भौतिक सुखाचा त्याग करून साधे तपस्वी जीवन ते जगले. संगीत व काव्य हे त्यांच्या रोमारोमात भिनले होते त्यांचे केदार रागावर अतिशय प्रेम संत वल्लांभाचार्य यांच्या मुळे ते कृष्ण भक्ती कडे वळले . ते कृष्णभक्तीत देहभान हरपून असे काही गायचे की कृष्ण ही डोलायला लागायचा. जीवन जगण्यासाठी नम्रता, करुणा, निस्वार्थी प्रेम हे महत्वाचं असत ते त्यांनी आपल्या गायनातून ,काव्यातून सांगितल . त्यांची काव्य ही सुद्धा देवावरची तळमळ,भक्ती, शरणांगती यावरच आहेत.पहाटेच्या भक्ती गीतां मुळे आपल्यातील दैवी शक्ती जागृत होते आपला भक्ती भाव जागा होतो म्हणून पहाटे गायल्या जाणाऱ्या भूपाळ्याचे श्रेय संत नरसी मेहतांनाच जाते . प्रत्यक्ष कृष्णा कडून त्यांना दैवी शक्ती व प्रेरणा मिळाली होती. ते कृष्ण भक्तीत इतके लिन व्हायचे की ते समाधी अवस्थेत जायचे . संगीताद्वारे व काव्याद्वारे ते कृष्णाशी संवाद करत . देवाचे नाव सुरेल पणे देहभान हरपून आळवणे हा त्यांचा छंद होता . भजन आळवताना ते केदार रागात रंगून जात. या रागाच्या व त्यांच्या उत्कट भक्तीने कृष्ण ही त्यांचा अंकित झाला होता. या रागाच्या स्वरांनी व कृष्ण भक्ती मुळे त्यांनी एका सर्पदंश होऊन गेलेल्या मुलाचे प्राण ही परत आणले होते . म्हणूनच केदार राग कृष्णाला फार प्रिय आहे .असेच एकदा एक माणूस त्यांच्या कडे आला . मुलीच्या लग्नासाठी सावकार पैसे देत नाही असे म्हणू लागला . नरसिंनी त्या माणसाला विचारले की तुला किती पैसे लागतील ? त्या माणसाला पाचशे ₹ हवे होते . नरसी थेट सावकाराकडे गेले चाणाक्ष व लोभी सावकाराला नर्सिंनची भक्ती व त्यांच्या गायनाच्या रागाची कीर्ती माहीत होती तो म्हणाला मी पैसे देतो पण पैसे वसूल झाल्याशिवाय तुम्हाला माझ्याकडे तुमचा केदार राग गहाण ठेवावा लागेल या पुढे तुम्हाला तो राग आळवता येणार नाही . नरसिंकडे हीच एक मौल्यवान गोष्ट होती . आता देवाचं दर्शन होणार नाही . त्याच्याशी आपला संवाद होणार नाही असे मात्र त्यांना वाटल नाही . थोड्याच दिवसात त्या माणसाच्या मुलीचे लग्न थाटामाटात पार पडले नरसिंना खूप आनंद झाला . आता भजन कीर्तन केदार रागा शिवयच सुरू झाले पण त्यात रस वाटेना . मन भरेना . देवाचं दर्शन नाही म्हणल्यावर ते अजूनच व्याकूळ झाले . असेच दिवसामागून दिवस जात होते तो माणूस काही पैसे देत न्हवता व केदार राग सवकरापासून काही मुक्त होत नव्हता . निंदा करणारे अशा वेळी टपूनच असतात . ते पुढे आले व नरसिंची भक्ती म्हणजे नुसत थोतांड आहे . असे म्हणू लागले . ही गोष्ट राजा पर्यंत गेली खरे खोटे करण्यासाठी नरसिंना बोलावण्यात आले . यासाठी राजवाड्याच्या एका दालनात श्री कृष्णाची मूर्ती ठेवली गेली व तिच्या हातात एक पुष्पमाला देण्यात आली. त्या मूर्ती पुढे नरसिंनी भजन कीर्तन करायचे व कृष्णाने सजीव होऊन ते भजन ऐकून ती पुष्पमाला नरसिंच्या गळ्यात घालायची असे ठरले पण यासाठी एक विशिष्ट वेळही देण्यात आला . आणि हे जर घडले नाही तर हे थोतांड आहे असे समजून नरसिंना कठोर शासन केले जाईल अशी राजाज्ञा झाली . हे ऐकून नरसी मात्र शांत,अविचल होते “प्रभूची इच्छा असेल तसे होईल” एवढेच ते म्हणले . निंदा करणाऱ्यांना तर नरसिंची फजिती बघण्यात विशेष रस होता . आता नरसिंच्या भक्तीची परीक्षा होती . त्या परमेश्वराला ही भक्तांची परीक्षा बघण्याची काय हौस असते समजत नाही . पण आपला भक्त हा कसोटीला उतरणारच हे पक्के ठाऊक असते त्याला म्हणूनच तो परीक्षा बघत असावा . नाहीतर नरसिं साठी प्रगट होणे त्याला का अशक्य होते ? किंवा केदार राग आळवला नाही तर कृष्णाने जागचे हलुच नये इतकी नरसिंची भक्ती लुळी पांगळी थोडीच होती ? नरसिंनी कृष्णा पुढे आसन घातले टाळ, वीणा घेतली घटिका भराभर चालल्या होत्या . अगदी मध्य रात्र झाली पण आता नरसिंच्या कसोटीचा क्षण दूर न्हवता निंदा करणाऱ्यांना जसं जशी वेळ जाईल तस तसा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या . त्यांना वाटत होत की आता हा नरसी राजा च्या हातून काही सुटू शकत नाही . पण त्याच वेळी नगरात एक चमत्कार घडत होता त्या सावकाराच्या घरावर मध्यरात्री थाप पडली नरसिंची हाक सावकाराच्या कानावर पडली . “कृपा करा दार उघडा” सावकाराने दार उघडले व त्यांचे स्वागत केले. नरसिंनी सावकारा समोर व्याज व मुद्दल ठेवले आणि म्हणले ” क्षमा करा पैसे परत करण्यास उशीर झाला आता केदार राग मोकळा झाला अशी पावती द्या . सावकाराने पैसे घेतले व करार पत्र काढून पैसे मिळाल्याची व केदार राग मोकळा झाल्याची पावती नरसिंच्या स्वाधीन केली . इकडे राजवाड्यात नरसी भजनात दंग होते मधे त्यांनी डोळे उघडुन श्री कृष्णा कडे पाहिले तो हसत असल्याचा त्यांना भास झाला . तेवढ्यात एक कागद अलगद त्यांच्या समोर आला व्याजा सकट मुद्दल मिळाल्याची व केदार राग मुक्त झाल्याची सावकाराची स्वाक्षरी असलेले ते करार पत्र पाहून नरसी चकीत झाले त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही . श्री कृष्णाची लीला अगाध होती आता त्यांचा केदार राग मोकळा झाला होता . नरसिंनी केदार रागात भजन आळवायला सुरवात केली त्या स्वरांनी एक वेगळेच स्वर भाव विश्र्व निर्माण झाले व कृष्णा भोवती एक तेजोवलय निर्माण झाले . निंदा करणाऱ्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली . नरसिंच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले . इतका वेळ जड अचेतन असलेली श्री कृष्ण मूर्ती सजीव झाली आणि आपल्या हातातील पुष्पमाला नरसिंच्या गळ्यात घडलण्यासाठी पुढे पुढे सरकू लागली . भक्ताची लाज राखणारे गिरिधर आपल्या भक्ताच्या गळ्यात पुष्पमाला घालून अंतर्धान पावले .

तर कशी वाटली भक्त नरसी मेहतांची कथा?

पुंडलिका वर दे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरी नाथ भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
जगत गुरू तुकाराम महाराज की जय
सर्व संत न की जय

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments