पैठण गावा मधे कुर्मदास व त्यांची आई झोपडीत रहात होते. कूर्मदास जन्माने पांगळा होते त्यांना गुढग्यापासून पाय व कोपरापासून हात न्हवते.याचे दुःख वडलांना पाहवले नाही व ते वैकुंठाला निघून गेले. आता राहिले कुर्मदास व त्याची आई. कूर्मदास भगवत भक्त होते. देवावर त्याची गाढ श्रद्धा,भक्ती होती. गावात कीर्तन सुरू झालं की यांना काही सूचायचे नाही आईच्या मागे मग हट्ट करून ते कीर्तनाला जात पण त्यांना पाठकुळी घेऊनच आईला जावे लागे. आता ते 22 वर्षाचे होते आईला ते कसे झेपले असते. याची कुर्मदासांना ही जाणीव होती पण टाळ मृदुंगाचा आवाज त्यांना स्वस्थ बसून देत न्हवता.आत्ताही एकनाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांचे गावात कीर्तन सुरू झाले. वारीचे दिवस होते.आई कडे त्यांनी कीर्तनाला न्हे म्हणून हट्ट धरला आई खूप वैतागली नाही म्हणली “अरे तू एवढा मोठा झालास मला तुझे ओझे नाही पेलवणार” असे सांगूनही ते ऐकत न्हवते आईला ही त्यांचा राग येत असे आणि ते बरोबरही असायचे . पण त्यांच्या हट्टापुढे तिचे काही चालले नाही. त्यांना पाठकुळी घेऊन कशीबशी ती कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचली व त्यांना सोडून निघून गेली झालं, कुर्मदास फरपटत फरपटत बुवांच्या पुढे जाऊन बसले . गळ्यात माळ,कपाळावर गंध अशा त्यांना पाहून महाराज हसले. कीर्तनात महाराजांनी पंढरपूरचा महिमा व वारीच महत्त्व सांगितल हे ऐकून कूर्मदासाने काही तरी निश्चय केला. कीर्तन झाल्यावर दिंडीचा पुढचा मुक्काम कुठे आहे ते त्यांनी दिंडीतल्या लोकांना सांगितल. कीर्तन संपलं सगळे जिकडे तिकडे पांगले मात्र कुर्मदास तिथेच बसून होते त्यांनी महाराजांना विचारले “मी येऊ का वारीला मला यायचं आहे त्या पांडुरंगाला भेटायला.”महाराज म्हणाले अरे पण तुला इथे आई घेऊन येते तसे वारीत कोण घेऊन येईल तुला आणि पंढरीला पोहोचायला खूप दिवस लागतील .पण कुर्मदास काही ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवते ते महाराजांना म्हणाले तुम्ही फक्त हो म्हणा मला वारीला येण्याची परवानगी द्या . महाराजांना माहीत होते हे अशक्य आहे पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून ते हो म्हणले.झालं, रात्र झाली सगळीकडे निजानीज झाली कुर्मदास उठले व महाराजांनी सांगितलेल्या गावाकडे फरफटत फरफटत निघाले . सकाळ झाली तेव्हा ते त्या गावात पोहोचले होते . घरोघरी जाऊन त्यांनी भाजी भाकरी महाराजांच्या दिंडीतील लोकांसाठी मिळवली. तोच महाराज आले पाहतात तर कुर्मदास आधीच पोहोचलेले त्यांना आश्चर्य वाटले पण आनंदही झाला.रोज त्यांचे कीर्तन ऐकावे हरिपाठ म्हणावा प्रवचन ऐकावे व रात्री खरडत खरडत महाराजांनी सांगितलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे त्यांच्या साठी जेवणाची व्यवस्था करावी भगवंताचे नामस्मरण करावे असाच त्यांचा नित्यक्रम झाला. असे करता करता येरमाळा बार्शी व नंतर लहूळे गाव लागलं.त्यांचं पोट पार सोलवतटून गेलं होत पण आता त्याच्यात ती शक्ती उरली न्हवती प्राण कंठाशी आले आहेत असे वाटत होते. ते तसेच एका कोपऱ्यात विव्हळत पडले होते . पण त्यांना माहित नसल तरी विठोबा खिस्ती नावाच्या व्यापाऱ्याचा वेश घेऊन पांडुरंगाच त्यांच्या वर लक्ष होत.ते पालथे होते. महाराजांनी त्यांना उताणा केल. पहिलं तर पोटावर खरडून त्यांचे सगळे पोट रक्ताने माखले होते त्यात दगडाचे तुकडे काड्या ,कचरा गेला होता सगळे अंग खरवडून निघाले होते. महाराज कुर्मदासांना म्हणले अरे आता अगदी हाकेवर पंढरी आहे.एकच मुक्काम राहिला आहे. इतक्या लांब आलास आणि थोडक्या साठी अस करू नको हळू हळू चल.पण आता मात्र त्यांच्यात शक्ती न्हवती. त्यांना बोलण ही अशक्य होत आत्ता पर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण ही न्हवता सगळ्या दिंडीतील लोकांची जेवणाची व्यवस्था करूनही ते मात्र उपाशीच होते .महाराजांना हे कळताच त्यांनी अरे अस का केलंस म्हणून विचारलं .महाराज रोज माझं मल मूत्र आई काढायची मी खाल्ल .पिल्ल असत तर इथ ते कोणी काढल असत असं त्यांनी म्हणताच महाराज गहिवरले त्यांचे डोळे वाहू लागले. कुर्म दासा हे काय केलंस अस म्हणताच मी घरी राहून तरी काय केलं असत महाराज निदान मी पंढरीच्या वाटेवर तरी आलोय.महाराज आता माझ्यासाठी एकच करा माझा निरोप त्याला द्या म्हणावं या जन्मात पुण्य कमी पडल म्हणून तुझ दर्शन नाही घेऊ शकलो. त्यांना अशा परिस्थीत सोडताना महाराजांचे पाय जड झाले.डोळे भरून वाहू लागले पण त्यांचा निरोप देवा पर्यंत पोहोचवायचे त्यांचं काम होत. महाराज चांद्रंभागेत स्नान करून देवाजवळ आले दोघांची दृष्टादृष्ट झाली न बोलताही देवाला सगळ समजलं. त्या वेळी वारी साठी ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज ही तिथे होते. पांडुरंग रुक्मिणीला म्हणले रुख्मिणी वारी तू सांभाळ मी चाललो माझ्या कूर्मदासाला भेटायला.देवांनी आपल्या बरोबर नामदेव व माउलींना ही घेतल व कुर्मदासा पाशी आले. कूर्मदासा डोळे उघड मी तुला भेटायला आलोय असे म्हणताच क्षणी कूर्मदासाने थोडे डोळे उघडले प्रत्यक्ष देवाला पाहताच ते रडू लागले सरपटत लोटांगण घालत ते देवा पाशी जाणार तोच देवाने त्यांच्या कडे धाव घेत त्यांना जवळ घेतले . पोटावर मायेने प्रेमाने हात फिरवीत त्यांचे डोके देवाने आपल्या मांडीवर घेतले.दोघांची दृष्टादृष्ट झाली देवाने विचारले बोल कूर्मदासा काय पाहिजे तुला तेव्हा कूर्मदास म्हणले देवा तुला तर प्रत्यक्ष पहिलच आहे पण महाराजांनी पंढरीच,चंद्रभागेच महात्म सांगितले होते ते पाहायचं राहिलं. देवाने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी छोटा खड्डा खणून त्यात चंद्रभागाच आणली.आजही तिकडे चंद्र भागेला पुर आला की इथल्याही विहिरीचं पाणी दुथडी भरून वाहतं. अशा प्रकारे कूर्मदासाने समाधानाने देवाच्या मांडीवर प्राण सोडले. असे म्हणतात की त्यांची समाधी माउलींनी व नामदेवांनी बांधली. या लाहुळे गावाला म्हणूनच धाकट पंढरपूर म्हणतात.

पुंडलिका वर दे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय
सर्व संतन की जय

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
शिवाजी चौधरी

अगम्य ती भक्ती