आज का बरं असं होतंय सारखं डोळ्यात पाणी येतंय. एक हुरहूर लागून राहिलीय मनाला, एक प्रकारची आस लागून राहिलीय. माझ्याकडून करवून घेतलेला पैल तोगे काऊ हा अभंग आज पुन्हा पुन्हा आठवतोय.मन कुठं तरी गुंतून गेल्यासारखं झालय.मी आळंदीत असून नसल्यासारखा झालोय. नेहमी पांडुरंगा जवळ असणाऱ्या मला परत पांडुरंगाची च ओढ का वाटतेय. आज निवृत्ती दादाची पण खूप आठवण येतेय. तो फक्त माझा दादाचं नाही तर गुरू ही आहे.त्याच लक्ष आमच्या भावंडांकडे नेहमी असतच तरी आत्ता त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवा वा अस आज मनापासून वाटतंय. माझा सोपान,मुक्ताई ला ही असच काहीतरी वाटतं असणार.म्हणून आज त्यांचीही आठवण येतेय. मागे आम्ही सगळे मिळून पांडुरंगाला भेटायला जात होतो ते त्याच सुंदर सावल रूप पाहून देहभान विसरून जायला व्हायचं.गावोगावीचे संत महात्मे या मुळे भेटायचे काय तो सोहळा असायचा ! सर्व प्राणिमात्रांच्यात एकच परमेश्वर आहे आणि तो चराचरात भरलेला आहे अस असल तरी एकमेकांच्या बरोबरीने त्याचे गुणगान करत त्याला भेटायला जायची ओढ काही निराळीच.

आज मागचं सगळ आठवतंय. आई बाबा गेल्यावर त्यानेच तर सांभाळल आम्हाला . नाहीतर एवढी सहन करण्याची ताकद कुठून आली असती आमच्यात.निवृत्ती दादाचं एक वेळ ठीक होत तो दुःख,अवहेलना,अपमान या सगळ्याच्या पलीकडे पोहोचला होता .त्या मुळे त्याही परिस्थितीत तो शांत होता.मुक्ता व सोपान तर अगदीच लहानच होते. त्यांनां यातलं कळतच न्हवत .मुक्ताला लहान असल्याने आईची सवयच होती लाडकी होती ती .आई शिवाय तीच काही चालायचंच नाही . सोपानही तसा लहानच होता पण त्याला थोडीतरी परिस्थितीची कल्पना होती . पण मुक्ताच च तस न्हवत आई बाबा गेले तेव्हा माझ्या गळ्यात पडून खूप रडली होती आम्ही सगळेच तिची समजूत घालायचा प्रयत्न करत होतो.आणि बरोबरही आहे तीच रात्री कुशीत घेऊन झोपलेली आई सकाळी नाही म्हणल्यावर हे असच होणार होत. आई बाबांची काही दिवसापासून होणारी कुजबुज ऐकू येत होती काहीतरी बिनसलंय,काहीतरी घडणार आहे याची पुसटशीही कल्पना न्हवती आम्हाला . आईचं ते आमच्या कडे डोळे भरून पाहणं.मायेने सतत जवळ घेऊन टीप गाळणं आठवतय. पण आई बाबा गेल्यावर आई नाही म्हणल्यावर सतत ज्ञाननदादा ज्ञानदादा म्हणत माझ्या मागे मागे असणारी मुक्ता आता किती मोठी झाली ना ?

पण तिला तेव्हा काही दिवसांनी सगळ कळून चुकल होत की काय माहीत नाही एकदम शहाणी झाल्या सारखी वाटू लागली होती ती .तिची वेणी घालायला मला कुठली येतेय कसं तरी केस बांधून देत होतो पण तिने कधीच तक्रार केली नाही.मला आठवतंय कुठला तरी सण होता की काय माहीत नाही पण तिला आम्हाला मांडे करून खायला घालायचे होते.आता ती आमची आई झाली होती.झालं पीठ तयार झालं पण ते भाजणार कशावर मग काय गेली कुंभारकडे तवा आणायला पण वाटेतच येसू काका भेटले ते तिला काहीबाही लागेल असच बोलले तिच्या गालावर,पाठीत धपाटे ही मारले झालं ,ते सहन न झाल्याने रडतच कुटीत आली तिला त्यांनी मारल्याच दुःख न्हवतच ते तर आम्हाला मांडे खायला घालता येणार नाहीत याचेच जास्त दुःख होत.मी ध्यानालाच बसलो होतो समोर माझे गुरू आणि बंधू निवृत्ती दादा ही होता त्याने आज्ञा केल्याने मी योग साधनेने माझ्या पाठीतून विस्तव प्रज्वलित केला आता मुक्ताला ना विस्तव पेटवन्याची ना तव्याची गरज होती तिला खूप आनंद झाला ती माझ्या पाठीवर मांडे भाजू लागली कावडातून दिसत होत की आजूबाजूच्या लोकांनी हे पाहण्यासाठी गर्दी केली होती त्या लोकांवर आम्ही काय रागावणार इथ सत्ता चलती ती फक्त परमेश्वराची . एकदा मुक्ताला खूप भूक लागली म्हणून मी गेलो गावात माधुकरी मागायला पण लोकांनी माधुकरी तर वाढलीच नाही उलट आई बाबा विषयी काही बाही बोलून संन्याष्याची पोरं म्हणून हेटाळणी केली.मला माझ्या अपमनापेक्षा आई बाबांना असं बोललेल आवडलं नाही मला खूप वाईट वाटल मी तसाच धुमसत झोपडीत आलो व ती लावून रडू लागलो सगळ्यांचाच खूप राग आला होता मला मुक्ता बाहेर खेळत होती मला असा रागाने झोपडीत शिरताना पाहिल्यावर ती लगेच पळतच आली व ज्ञानदादा ताटी उघड म्हणू लागली पण मी काही ताटी उघडणारच न्हवतो . संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी,योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा,असे म्हणून तिने मला असे काही समजावले की मला बाहेर यावेच लागले . आता मी लहान व ती माझी मोठी बहीण झाली होती.ती एवढी शहाणी कधी झाली ? मग मीच का असा वागलो ? असे प्रश्न मलाच पडू लागले. असच ज्या साठी आई बाबा ना विसरायचं म्हणत होतो पण लोकं ते तस आम्हाला विसरू देत न्हवते. सन्यशाची पोरं म्हणून हसत होते.साधी माधुकरी ही कोणी वाढत न्हवते.आणि वाढली तर माधुकरीत उतारे,चिंध्या असं काही बाहि मिळत होत पण माधुकरीला नाही म्हणायचे नसल्याने ते स्वीकारावे लागत होते.आम्हाला काही कळतच न्हवत ते आमच्या आई बाबांना असं म्हणून का हसत होते.का आमची अवहेलना करत होते. काय चूक होती त्यांची ? आमच्या बाल मनाला असले पडलेले प्रश्न सोडवताना निवृत्ती दादाची चांगलीच दमछाक व्हायची. नावा प्रमाणे तो या सगळ्यापासून निवृत्त होत होता.सतत डोळे मिटून शांत बसत होता.त्याच्यावर आम्हाला सांभाळायची जबाबदारीच येऊन पडली असली तरी तो मात्र आमच्यात असून नसल्यासारखा होता . ह म्हणून तो आमची काळजी करत न्हवता अस मात्र नाही पण त्याला या जन्मीच कोडं गुरूंच्या मुळे उलगडल असावं. मन शांत करायला मग तो आम्हाला घेऊन पंढरीला निघायचा तिथे इतरही संत महात्मे आलेले असायचे सगळेच मग तल्लीन होऊन त्याच्या पुढे नचायचो . कुणी अभंग कुणी कीर्तन ही करायचे. हे सगळ बघून तो कुठला विटेवर राहतोय तो ही कुणाला खांद्यावर,कुणाला डोक्यावर कुणाचे हात धरून आमच्या बरोबर अगदी दमे पर्यंत नचायचा, इतका नाचायचा की त्याचा पितांबर गळून पडल्याचही त्याला भान नसायचं. आम्हाला तरी कुठे कळायचं ते ? सगळाच आनंदी आनंद. परत निघताना मात्र एवढा मोठा देव पण अगदी लहान मुलासारखा व्हायचा. मला भेटायला याल ना ? म्हणून विनवण्या करायचा. आम्हाला सोडायला तर देवपण विसरून चार पाच कोस दूर यायचा हेच येताना पण असायचं दोन्ही वेळा डोळे भरलेले असायचे आमचे दोघांचेही फरक इतकाच की येताना आनंदाश्रू व जाताना नुसते विरह अश्र असतं . आम्हाला न्यायला यायचा ना त्या वेळी त्याच्या खांद्यावर मी व निवृत्ती दादा असायचो सोपान व मुक्ता त्याचा हात धरयचे व नामदेव व जनी हे दोघं कडेवर असायचे मग नाचत गात तो आम्हाला राउळात घेऊन जायचा .त्याच्या कडे गेल्यावर आई बाबांची माया मिळायची आम्हाला. मग आम्हाला ही निघताना पाय जड व्हायचे इतकी माया इतकं प्रेम इथल्या शिवाय आम्हाला कोठून मिळणार होत ? त्याचे ही डोळे पाण्याने काठोकाठ भरायचे विरह काय असतो ते तेव्हा दोघांनाही जाणवायचं.आई बाबा गेले तेव्हा तरी लवकर सावरलो पण त्याला भेटल्यावर परत परत भेटण्याची ओढ मनाला अस्वस्थ करायची. पण तिथेच थांबून ही चालणार न्हवत आम्ही तिथे थांबायचा कितीही हट्ट केला तरी दादाला ते मान्य न्हवत त्याला म्हणे आमच्या कडून काहीतरी राहिलेलं काम करून घ्यायचं होत. त्याचं आणि देवाचं काय बोलणं व्हायचं ते त्या देवालाच ठाऊक. निवृत्ती दादा आम्हाला घेऊन खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगायचा . त्याचे बोलणे अगदी ऐकत राहावे असे वाटायचे.योग साधना तो शिकवायचा . त्याच अस झालं होत की, मागे एकदा आम्ही सगळेच ब्रम्हगीरीला गेलो होतो दर्शन करून येतच होतो पण येताना आजूबाजूच्या जंगलातून वाघाचे गुर्गुरणे ऐकू आले बापरे ! त्याची ती डरकाळी आठवली की अजूनही मन घाबरत. डरकाळी ऐकली तशी सगळ्यांची पळापळ झाली निवृत्ती दादा लपण्यासाठी एका गुहेत गेला. तिथे त्याचे गुरू गाहिनी नाथ जणू काही त्याची वाटच पाहत होते ते नाथ संप्रदायाचे होते पण दादा तिथे आहे हे आम्हाला माहितच न्हवत खूप वाट पाहून आम्ही परत आलो त्या नंतर निवृत्ती दादा आला तो ज्ञान घेऊनच आम्हाला जवळ बसवून तो ज्ञानाच्या योगाच्या गोष्टी सांगायच्या . गीतेवर त्याच प्रेम होत पण ती सौस्कृत मध्ये होती त्या मुळे ती सर्व सामान्यांना वाचता येत न्हवती हीच एक खंत त्याच्या मनात होती तो ते बोलूनही दाखवत होता. त्या वेळचा समाज खूप जाती पातीत अडकून होता. पुराण पोथ्या वाचणं देवाची पूजा अर्चा करण हे एक विशिष्ट समाजानेच करायचं अस काहीतरी मत होत त्याचं त्यातून ते सौस्कृत ही होत मग ते सगळ्यांना वाचताही येणार न्हवतच.भक्ती कशी करावी ? का करावी ? हे समाजाला कळणे महत्वाचे होते.देवाला सर्व सारखेच.कुठल्याही प्रकारे केलेली भक्ती ही देवापर्यंत पोहोचतेच .देव जात पात बघत नाही सगळी देवाचीच लेकरे आहोत ,सगळीकडे तो आहेच हे लोकांना सांगून त्यांना भक्ती मार्गाला लावणे हेच मुख्य काम होत दादाचं व त्यात त्याने आम्हाला ही बरोबर घेतल होत त्या मुळे आमच्या सगळ्यांचा तो दादा होता तसाच गुरूही होता याच कार्यासाठी दादाला त्याचे गुरू गहिनीनाथ गुहेत भेटले होते. एकदा निवृत्ती दादाने मला मिठी मारली माझे अष्ट सात्विक भाव तेव्हा जागृत झाले असेच वाटतं होते.दादाने मला हाताला धरून त्याच्या समोर बसवले माझं शरीर रोमांचित झाल होत मी नकळत त्याच्या समोर बसलो त्याने त्याचा उजवा हात माझ्या मस्तकावर ठेवला त्यासरशी माझा अहंभावच नष्ट झाला विषयांचा विसर पडला तहान भूक शमल्यासरख वाटल.माझे सगळे अंग थरथरत असताना दादाने माझ्या कानात “अयमात्मा ब्रम्ह ” असे म्हणल आणि मी आंतर बाह्य बदलून गेलो.

आज परत तेच तसेच त्याच्या समवेत पांडुरंगाच्या भेटीचे दिवस आलेत .आत्ताही मन त्याच्या आठवणीने व्याकुळ होतय त्याला भेटण्याची खूप आस वाटतेय ओढ वाटतेय.कधी एकदा निघतोय असं झालंय.तिकडून दादा.मुक्ता.ही येतील सोपान तर माझ्या बरोबरच आसेल.बऱ्याच संतांच्या दिंड्या येतील ते ही भेटतील. आळंदी ही माझ्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांनी भरून वाहातेय.जिकडे तिकडे माझ्या विठ्ठलाचा जयजयकार होतोय.कुणी फुगड्या खेळतय कुणी नाचतय.कुणी गातय, कीर्तन.प्रवचन करतेय याने आसमंत अगदी गजबजून गेलाय . भक्ती.श्रद्धा कशी असावी या माझ्या भोळ्या वरकर्यांवरून समजतंय.उन्हाची,पावसाची पर्वा न करता,तहान भूक विसरून या चालणाऱ्या माझ्या वारकर्यान सोबत, त्यांच्या बरोबर मी आज जाणार आहे.माझ्यावर विश्वास ठेऊन ते माझ्या सोबत आहेत पण सगळ करता करविता तर तोच आहे.ते मला मोठ्या प्रेमाने मायेने माऊली म्हणतात पण खर तर देवा तूच आमची सगळ्यांचीच माऊली आहेस. मला तर तू त्यांच्यातच दिसतो आहेस. कधी कीर्तनात नाचताना , कधी हरिपाठात पखवाज वाजवताना तर कधी प्रवचनात शांत बसलेला.कधी वारकऱ्यांना गंध लावताना कधी संतांच्या पालखीचा रथ ओठताना तर कधी वरकर्यांसोबत जेवताना.कधी त्यांच्या साठी जेवण बनवताना कधी पाऊस होऊन त्यांना गारवा देताना तर कधी उन होऊन मायेची उब देताना.कधी त्यांचं पांघरून होणारा तर कधी त्यांच्या हातातील पताका होणारा तर कधी रस्त्याने त्यांना खाऊ वाटणारा . सगळीकडे चराचरात तुझ अस्तित्व आहे. देवा तू आणि वारकरी वेगळा कसा असणार ? पण तरी त्यांच्यातला भक्तीभाव,तुझ्या चरणी रुजू होऊदे. कुठल्यान कुठल्या रुपात त्यांना तुझ दर्शन दे.एखाद्या वेळी ते त्यांना कळणार नाही कारण तो भोळा आहे तरी त्याची भक्ती तुझ्या पाई राहू दे. आज मला पैलं तोगे काऊ कोकताहे हा अभंग का नव्याने आठवतोय ते समजल.तो आमची आणि त्याच्या भेटीची शुभ वार्ताच देतोय

|| पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ||

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments