पालखी सोडून भोई गेले

पालखी सोडून भोई गेले !

——————————-

घेऊन आलो खांद्यावरुनी शतकांची पालखी

राजा होता,प्रधान होता तीच होती मालकी ||

सळसळ होती पानांमधुनी,कुजबूज होती रानी

घामामधून श्वास विरघळे,अंगभर विटाळ पाणी ||

गोठविताही गोठू येईना चाले संतत धारा

हुकूमाचा तो ताबेदारही, लोटून देई वारा ||

नीतीभ्रष्टांच्या पुरासवे मी, वाहत आलो कैकदा

वाटेवरती स्थिरवलो अन वळलो पुन्हा एकदा ||

भूमीसाठी हृदय वाहण्या झुकलो जरासा परी

पालखीतले हात निघाले,पुरते घुसले उरी ||

फुलाफुलांच्या मनात तेव्हा सले शल्य मोकळे

ह्या भोयाला स्पर्शून जावे रंगावे आगळे ||

या शतकाची वेळ आजची झुले स्फुरे अंबर

खांद्यावरले व्रणही उठले,कसुनिया कंबर ||

धमण्या चिडल्या,कोसळले नभ,वृक्ष बने खंबीर

पाय झटकुनी क्षणात उठले,तटस्थ औदुंबर ||

 

                   —— प्रसाद सावंत

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments