श्रावण निनाद

श्रावण निनाद 

श्रावण भरात पिवळी खैरात

सोन्याच्या किरणी वारा

पाठीला वार्‍याच्या ,मेघांची कमान

कमानी थेंबांचा पारा ||

थेंबात गुंजते पाऊस भूपाळी

मोरांच्या पायात आधा धुमाळी

तालात डुले पिसारा ||

तालाच्या निनादे, प्रसावे संगीत

सृष्टीत दाटले, कंचन गीत

सप्त सुरांचे हिंदोळे दारा ||

सुरांच्या आलापी अवरोही पीळ

सरींच्या गालावरी सोनेरी तीळ

कोकीळ जपे गांधारा ||

प्रसाद सावंत 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments