वेदाने महायज्ञ घडत नसतात

वेदाने महायज्ञ घडत नसतात.

विश्वशांतीचे तुरे खोवून

अस्थिर जत्थे

हुकमी पत्त्यासारखे

पुढे सरकवता येत नसतात .

वेदांचे स्वातंत्र्य विधात्याकडे गहाण आहे !

सडकेवरले भविष्याहि

आज जगापुढे लहान आहे.

महायज्ञाच्या डोळ्यातून

क्रोध कधीच लाल झाला नाही.

त्याची अस्थिर ज्वाला

अन्यायाच्या आभाळापर्यंत भिडलीच नाही.

फक्त निरर्थक धुपारती

गुलामा सारख्या जळत राहिल्या.

यज्ञाचे मूळ स्वरूप

सतत धूरात लपवित आल्या.

वेदाची गुळंमट कारणेही आम्ही ऐकलित.

यज्ञाच्या साम्राज्यात

आजच्या सार्‍या

काफिल्यात मिसळलेले

श्वासतंतू जळून जातील.

उजाड हिरवळ सारीकडे

दिमाखाने मिरवेल.

अस्थिर जत्थे

तुरे लावून बदलत नसतात.

वेदाचे वेड लावून

महायज्ञ घडत नसतात.

तुमच्या महायज्ञाने दिशाच गमावलीय!

एक मात्र खरे आहे —

तुटून पडलेली तरुण पाने

पुन्हा नवे बंड करतील

तरीसुद्धा

दूरदेशीच्या वाळवंटातील

एका उंटाने

पुरेसे पाणी राखण्याची

हमी घेतली आहे.

 

प्रसाद सावंत

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Sahadeo Mestry

खूप चांगली कविता!👌👌👌