रामरायाचे मनोगत

रामनवमीच्या दिवशी भर माध्यान्ही रामाचा जन्म झाला चैत्र शुद्ध नवमी पुनर्वसु नक्षत्र, चंद्र वगुरु लग्नौ असतांना पाचग्रह उच्चीचे असतांना कौसल्येन एका सुकुमार बालकाला जन्म दिला परंतु भर माध्यान्ही जन्म दिल्याने की काय या उन्हाचे चटके रामाल आयुष्यभर सोसावे लागले रम्य ते बालपण केव्हाच संपलं आणि आता गादीचा वारस म्हणून रामाच्या नावाची चर्चा होऊ लागली वडिलकीच्या नात्याने सिंहासन रामा कडे येणारच होत पण कैकेयीच्या डोक्यात मंथरेन विष कालवलं बाईसाहेब मुलगा तुम्हालाही आहे तोराजा का होऊ नये? त्याला सिंहासन कां मिळू नये मंथरा आपलं काम आटोपून निघून गेली पण कैकेयीन डाव आखला राहिलेले दोन वरदशरथ राजाला मागून घेतले रामाला १४ वर्षे वनवास व भर ताला राज्याभिषेक इथूनखर रामायणाची सुरुवात झाली राम पत्नी सीताव लक्ष्मणासहित वनात निघून गेलो एवढी सुंदर सोज्वळ सात्विक पत्नी असून देखील कधी उतावीळपणान वागता आल नाही पडिलकीची बंधन माझ्यावर आली सांसारिक सुखाचे दिवाळ निघाल वनात जे मिळेल ते खायच काट्याकुट्यांशी दोस्ती करायची आणि झोप आली की झोपायच पण नियती ला हेही मान्य नव्हत आणि रावणाचा डोळा माझ्या सीतेवर पडला त्यान तिला पळवून नेली . मनचिंती ते वैरीन चिंती असम्हणतात माझीसीता रावणाच्या तावडीत पवित्र असेल कां? हा प्रश्न डोक्यात आला की मला माझ्या पुरुषत्वाची चीड यायची मलामाझ्या भीडस्त स्वभावाचा राग यायचा सीतेला सोडविण्यासाठी युद्धाशिवाय पर्याय नव्हता वेळोवेळी लक्ष्मण मलाधीर देत होता शेवटी हनुमंत वइतर वानरसेनेच्या मदतीनेमी युद्ध पुकारल आणि पर्वतकाय अशा रावणाला धारातीर्थी पाडल अयोध्येल परत आले आज सीता माझ्या जवळ होती परंतु लोकमानसात शंकानि घाली खरोखरच सीतामाई पवित्र आहे का? आणि मी सीतेचा त्याग केला तेव्हामी सीतेचा पती नव्हतो की कौसल्येचा राम नव्हतो मीहोतो फक्तराजा आणि प्रजेच सांत्वन हेचमाझ हित होत आणि अशारीतीनं त्याग त्याग आणि त्यागव माझ्या नशिबी आला आणि मातृसुखाच्या वाटेवर असतांना मी सीतेच्या मनाची पर्वा न करता तिसादूर लोटल आमची पितापुत्रांची भेट रणांगणात झाली त्यांच्याच तोंडी माझ चरित्र ऐकून मी शरमिंदा झालो माझ्याभोवती मोठमोठी विशेषण होती मर्यादा पुरुषोतम आजानबाहू अजातशत्रू आणि त्या मर्यादामला पाळाव्या लागल्या त्यात माझी खूप ससेहोलपट झाली माश्यानशिवी संसारसुख नव्हतच मलाही मर्त्यलोकात आल्यावर एक माणूस म्हणून जगायच होत तुमच्या सारख स्वतंत्र राहायच होत . मुलाबाळांना वेळ घ्यायचा होता पण तुम्ही मला संस्कारांच्या बंदिस्त कोठडीत अडकवून श्वासही घेऊ दिला नाही राजवाड्याच्या तटस्थ भिंतीत मी गुदमर लो पण माझ्या मनाच सांत्वन करायला कोणीच नव्हत म्हणूनच आतामला देऊशकत असाल तर एकच द्या – लहानपण दे गा देवा, मुंगीसाखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार . जयाअंगी मोठेपण तया यातना कठीण . तया यातना कठीण

PrabhaJoshi

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments