मकर संक्रांत

मकर संक्रमणाचे आले पर्व

जाणून घ्या आता त्याचे मर्म

दक्षिणायन संपून उतरायण होते सुरु

दिवस कणाकणाने वाढतो असे म्हणू

संक्रमण म्हणजे बदल

नियतीलाही बदल हवा असतो

बदलाने घडतो इतिहास

इतिहासाने घडतो – माणूस

तिळगुळाची आहे या सणाला महती

सर्वांना आपलसं कराव असं आहे ख्याती

जुन्या वैमनस्याला द्या विश्रांती

गुळाच्या गोडीनं जोडू या नवीन नाती

काळ्या रंगाला शुभ मानते संक्रांत

गोधडीची ऊब सामावली असते त्यात

सर्व समावेशक तला यात असतो वाव

म्हणूनच काळ्या रंगाला दिला भाव

देत रहा देत रहा हेच सांग ते संक्रांत

कर्म करत रहा हेच आहे वेदांत

दिल्याने वाढतो पैसा दिल्याने वाढते संपती

दिल्याने वाढते विद्या ‘ दिल्यानेच वाढतो स्नेह

म्हणूनच तिळगुळ घ्या गोड गोड बोला

  1. तिळगुळ घ्या गोड गोड बोला
PrabhaJoshi

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments