बाप

बाप —
आयुष्याला प्रत्येक टप्प्यात चालायला शिकवणारा बोलायला शिकवणारा ध्येयासाठी वाटचाल करायला शिकवणारा हसरा चेहरा दिसला कि मन प्रसन्न झल्यासारखं वाटतं आज त्याचा चेहरा खळखळून हसत होता. माझ्याही पेक्षा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता पटापट मी आवरलं आयुष्याची लढाई जनु त्यानेच जिंकली असा काहीसा गुरुर त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि आम्ही गाडीत बसुन माझ्या स्वप्नाच्या दिशेने वळत होतो त्याच्याकडे बघितलं तो मात्र हसत होता परंतू माझ्या मनातलं विचारांचं काहूर काही थांबत नव्हतं कारण माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझ्या बापाने जमावलेली जमापुंजी पोटाला पिटारा पाडून केलेल्या कष्टाचा पेटारा मी एकटी घेऊन चालले होते एका बाजूने लोक थांबवताना आणि दुसरीकडे माझा बाप पायाला चाक लावल्यासारखा माझ्या स्वप्नासाठी धावणारा मी बघितलाय….
माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण जशी त्याने सावरू घेतली तशीच नेहमीप्रमाणे ही अडचण देखील त्याने हसत हसत पेलवत नेली. मी अलगद त्याच्या पायाला हात लावला आयुष्यभराचे जाळे विनत असलेल्या माझ्या बापाच्या पायाला मुल्खाभराचे जाळे आणि भेगा झालेल्या मी पहिल्या..
स्वतः तुटकी चप्पल घातलेला आणि मला दहा चपलाचे जोड घेऊन देणारा माझा बाप मी पाहिलाय…
कपडे धुताना जेव्हा त्याची बनियन धुवायला घेतली तेव्हा माझ्या भविष्यातले खड्डे बुजवत असलेला फाटक्या बनियाणीचा माझा बाप स्वतःला बनियन घ्यायला विसरला होता…
प्रत्येक बाबतीत अतिशय अलगद पणे सावरसावर करणारा माझा बाप माझ्या बाबतीत मात्र वाटवृक्षासारखा खंबीर उभा होता : उभा आहे आणि कायम असणार…     -मयुरी गजानन आंधळे
मयुरी गजानन आंधळे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
प्रसाद सावंत

सुंदर