माऊली

मानव रुपी ज्ञानेश्वरात दडला होता अंश देवाचा

म्हणूनच तर प्रसन्न रुपी वातावरणाचा अलौकिक काळ होता तेव्हाचा

 

जीवनाच्या साराचे साक्षात उत्तर होते माऊली

अरे मानवा मग का तू फिरतोस मनात असंख्य प्रश्न ठेवूनी

 

सात्विक साधे रुपच ज्यांची होती ओळख 

ज्या शुद्ध भावाची त्यांच्या जीवनात जाणवायची झळक

 

जीवन जगण्याची कला ज्यांना अत्यंत सुंदररित्या उमजली होती

म्हणूनच अनेकांच्या बेरंग जीवनातही त्यांनी रंगबेरंगी शब्दांनी भरली झोळी होती

 

ज्यांच्या मुखातून सर्वच शब्द बाहेर पडता शब्द झाले स्वर्ण अक्षरे

म्हणूनच तर त्यांच्या शब्दासंग्रहाला आजवर इतिहासात ज्ञानेश्वरी म्हणून ओळखले गेले!!

 

                    -वृंदा कुलकर्णी

Vrinda Kulkarni

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments