मी कवी.

चाफ्याच्या फुलाच मला कधी
अपृप वाटल नाही
वासाच फुल ह्या पलीकडे
त्यात काही दिसलच नाही

कोरडा कवी की काय
तसच काहीतरी होत.
प्रत्येक गोष्टीत कविता
अस काही न्हवत.

सुचलं तर लिहायचो ,
वाटल तर बोलायचो
मुद्दाम लिहीन म्हणूनही
कधीतरी बसायचो

कधी कविता व्हायची ,
कधी व्हायची चारोळी
लिहीन लिहीन अशी
कधी नुसतीच आरोळी

बाकी आकाशातून पडणारा पाऊस
आजकाल नोव्हेंबर मध्ये पडतो
आपल्या चुकांमूळे की काय
त्याचा समतोल बिघडतो

कवी मनाचं ही
असच काहीस होत
पैशांमध्येच आजकाल
कवित्व असतं
त्याच्या शिवाय तस्
चालत ही नाही
नुसत्या कवितेने काही
भागतही नाही

एकंदरीत च सगळं प्रॅक्टिकल झालय
आतल्या कवीला आता
कसलं व्यसन लागलंय
शब्दांची नशा आता
होतेतरी कुठ
कवितेमध्ये मन अस
रमत तरी कुठं..

तसं मी कधी कवी वगैरे न्हवतो
लोकांचं म्हणणं होत, हा चांगल लिहितो
थोड फार लिहून मलाही बर वाटायचं
इतकचं कायते माझ कविपण असायचं.

_अनमोलकुलकर्णी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments