आभासी जग हे सारे

आभासी जग हे सारे
खरी ही आस नसे
बागेच्या अंगणी मज
रोज हा आरसा दिसे ..

जीव ओवाळला जरी
जीव न मी होऊ शके
सावलीचे काम माझे
अंगणी न मी राहू शके

आत येण्या पाहीन मी
पंख माझे छाटले जणू
अंगणीची ही पालवी
अंगणीच व्हावी रुजू.

वाट मी बघतो आहे
ऋतू हे बदलतील पण
बहरीन मी अंगणी अन्
आत ही येतील सण.

बहर आला रात्र सरली
पण उमलली नाहीत फुले
देवारा ही मोकळा अन्
अंगणीच कोमेजली फुले

दिस, रात्र, प्रहर, ऋतू,
नुसतेच बदलत होते
अंगणीच्या त्या मला
अंगणीच हे रमणे होते.

__अनमोलकुलकर्णी

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments