माझा देश

*७१ माझा देश*
प्राणांहूनही  प्रिय मला
असे माझा भारत देश
भिन्न जाती धर्म नांदती
नानाविध असती वेश

पारतंत्र्ये त्रास सोसती
विरांची ती निधडी छाती
देऊनी प्राणांची आहुती
हौतात्म्या सुखे आलंगती

संसाराचे होइ तर्पण
देशासाठी स्वसमर्पण
देह हा करूनी अर्पण
हुतात्मा हे लाभे भुषण

त्यागाने स्वातंत्र्य लाभले
क्रांतिवीर धैर्याने लढले
बलिदानाचे सार्थक झाले
राष्ट्राने स्वातंत्र्य मिरवले.
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१५ ऑगस्ट २०२२
©️ सर्व अधिकार आरक्षित.
पुर्व परवानगीशिवाय अन्य कोठेही
प्रकाशित करू नये.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments