जीवन

इच्छाशक्ती नुसार फक्त
सर्व काही शक्य असतं
निर्मिती तर दैवी देणं
त्यास कसले आले कुंपण

कधी हसतं कधी फसतं
तरी जीवन जगायचं असतं
अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर
तर आयुष्य सावरायचं असत

निसर्गाची शिकवण खास
प्रत्येकाला मिळणार घास
म्हणून कधी घाबरायचं नाही
जगणं मात्र सोडायचं नाही
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१९ जुलै २०२२

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments