दवबिंदू

दवबिंदू
असे दैवाधीन । जन्म मानवाचा ।
विधात्या कृपेचा । प्रसादच ॥

कोणा हाती नसे । कोठे जन्म घ्यावा ॥
पूर्वकर्मे ठेवा। मिळणार ॥

जरी जन्म झाला । मानव जातीत ।
जाणीव कृतीत । राहु द्यावी ॥

अनाचारा पाठी । राहू नये दंग ।
ठेवावा सत्संग । नेहमीच ॥

पाप पुण्याईची । असे जग रूढी।
विधात्याची पेढी । हिशोबाला ॥

जीवन स्वरूप । भासतसे कैसे ।
आळू पर्णी जैसे । *दवबिंदू* ॥

मिलिंदाच्या मते । आशिष गुरूंचा ।
भार जीवनाचा । तारणार ॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१७ जुलै २०२२

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments