ओळख

तशी आपली ओळख नवी होती

पण तू मला जुनीच होतीस

मखमली थंडीत पडणारे

फुलांवरील दवबिंदू होतीस.

 

 

 

गाली तुझ्या रंग चढला

तो आसमंती पसरला

तुझ्या इशाऱ्यावर तो वेडा

तुझ्याचं आधीन झाला.

 

 

 

नाक मुरडण्याची कला

साऱ्यांनाच जमत नाही

दाताने ओठ चावयची सवय

तुझी काही सुटत नाही.

 

 

 

 

डोळे दिपवणारे तू

रेखाटलेले चित्र होतीस

पाण्यावर अलगद तरंगणारे

फुलाचे पान होतीस.

 

शेअर करा..

guest
9 Comments
Inline Feedbacks
View all comments
RANJEET TONE

Good…!!!!

शुभम

एकदम मस्त👍👍

Umesh kolte

Nice 👍

Priyanka

Nice👏

Pranita

Excellent 🎊