विठुराया

आज विठुराया लय च खुश होता

त्याचा हात मातुर कमरेवर तसाच व्हता

रखमी म्हणे विठुले

आज लयचं खुश दिसता

दोन वर्षाची कसर आजच

भरून काढता

नाही ग रखमे

मले ते कामच लय भावल .

लोकायच दुख मले आता गावलं

देवा मले हे दे ते दे

लयच – असते मागनं सार

माय नाव घेतांना विचार करते फार

रखमे यायले एकच सांगाव लागते

एकदा तरी करा पंढरीची वारी

मुखान म्हना जय विठ्ठल हरी

जय विठ्ठल हरी

जय विठ्ठल हरी

कवा भी हकमारा

हा विठुहाय तुमच्या दारी तुमच्या दारी

 

 

 

 

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments