प्रारब्ध

प्रारब्ध म्हणजे काय
तर देणं
होय
परतफेड करण्यासाठी आपल्याला जन्म मिळालंय
आपण ज्यांच्या संपर्कात आहोत त्यांचे देणे संपले की ते आपल्याला विसरतात वा सोडून जातात किंवा विलग होतात.
दुःखाचे कारण हे की आपली माणसे आपल्याला विसरतात
पण तसे नाही आपला जन्मच मुळी त्यांचे उपकार फेडण्यासाठी झालाय हे लक्षात घेतले की जिणे सुकर होईल
कधी कधी आपल्या जवळचे कुणी आपल्याशी वेडे वाकडे वागले की दुःखी होतो
पण लक्षात घ्या आपण त्यांचे ऋणी आहोत म्हणून त्यांच्यासाठी आता झटावे लागतंय
तर तात्पर्य असे की
आलेले दुःख मेहनत कष्ट त्रास ही सर्व परतफेड करण्यासाठी आहेत
एकदा हे मनात ठसले की बघा हे जिणे आनंदाचे गाणे होईल
करून टाका परतफेड व लवकर मोकळे व्हा
पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणे नको

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments