राजमा चावल

राजमा चावल –

राजमा हे थोडे लाल थोडे काळसर असे दिसणारे
एक परिपूर्ण कडधान्य आहे.
कारण यामध्ये अनेक पोषक घटक आहेत जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय दुपारच्या जेवणात कांदा टोमॅटो च्या रश्श्यात आणि सकाळ संध्याकाळच्या नाश्ता साठी उकडून थोड्या आवडीच्या मसाल्यात नुसता किंवा इतर सलाड बरोबर राजमा नक्कीच बनवू शकतो. राजमा ला किडनी बीन्स असंही म्हणतात.
सल्लूभाई म्हणजेच सलमान खान चे आवडते राजमा चावल.
राजमा चावल हा हिंदी पिक्चर सुद्धा होता.ऋषिकपुर ने आपल्या धमाल कॉमेडी टाइमिंग ने मजा आणली होती.
. राजमा मध्ये फायबर्स, प्रथिने, कार्बोहायड्रेट भरपूर असतात. राजमा एक प्रोबायोटिक म्हणूनही काम करते. मात्र लक्षात ठेवा राजमा पचायला जड असल्यामुळे कधीच रात्रीच्या जेवणात राजमा बनवू नये. असे पण रात्री कुठलीच कडधान्य खाऊ नये.
दुपारच्या जेवणात हलका राजमा चावल किंवा संध्याकाळच्या स्नॅक्साठी राजमा टिक्की, राजमा रॅप .. कोशिंबीर किंवा सूप बनवू शकतो. राजमा स्टफ्फड गव्हाच्या पीठाचे मोमो मी परवा बनवले होते आणि हा नवीन प्रयोग सर्वांनाच खूप आवडला.
उत्‍तर भारतामध्‍ये घेवडयाला राजमा म्‍हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक इत्‍यादी जिल्‍हयांमध्‍ये श्रावण घेवडयाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते
शाकाहारी असो किंवा मासांहरी पण बऱ्याच लोकांची राजमा-चावल डिश ही खूप पसंतीची असते. चवीलाच नाही तर राजमा वजन कमी करण्यासाठी खूप मदत करते.
राजमामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. या फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते. इतकंच नाही तर खूप उशीरापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे अति खाण्यापासून धोका उद्भवत नाही. त्यासोबत राजमामध्ये कमी फॅट देखील असते. राजमा खाल्ल्यास उशीरापर्यंत शरीरात ऊर्जेची क्षमता कायम असते. त्यात राजमा वजन कमी करण्यासही मदत करते. फायबर आणि प्रोटीनच्या व्यतिरिक्त यात एन्टीऑक्सिडेंट्स देखील असतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते व मधुमेहासाठी उपयोगी आहे.मायग्रेन समस्येवर पण राजमा उपयुक्त आहे.
महाराष्ट्रीय लोक विशेष तर राजमा पूर्वी खात नसे पण हल्ली इतर धर्मीय आणि जाती या परस्पर संबंधामुळे महाराष्ट्रीयन लोक देखील राजमा खाऊ लागले आहेत आणि तो आता सर्रास विपुलतेने उपलब्ध आहे.

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments