कुठलाही व्यवसाय छोटा नसतो

 

कुठलाही व्यवसाय छोटा नसतो…. –

त्यादिवशी माझी चप्पल तुटली बाजारामध्ये
आणि मग चंभारा कडे जावे लागले चप्पल शिवायला
चांभाराने पटकन चप्पल शिवून दिली. पाहिलं तर एक तरुण मुलगा होता चांभार आणि बाजूला त्याचे आई वडील बसले होते .
मी त्यांना म्हटलं हा तुमचा मुलगा शाळा कॉलेजमध्ये मध्ये गेला नाही का ? तुमचा जन्म हेच काम करण्यात गेला .मग याला पण हेच बनवायचे का तुम्हाला ?तर तो मुलगा म्हणाला ..हो ताई असं काय बोलता ??माझा कॉलेजचं शेवटच वर्ष चालू आहे. आता माझ्या वडिलांना नीट दिसत नाही आणि आईच्या डोळ्यात मोतीबिंदू पडलाय ऑपरेशन करायला पैसे जमवायचे म्हणूनच हा धंदा केला तर कुठे काय बिघडलं .चप्पल शिवण काही वाईट नाहीये ..हो नक्कीच नाही
नडलेल्यांना अडलेल्याना मदत करतोस पटकन .रस्त्यात चप्पल तुटली तर तु ती शिवून देतो आणि आम्ही माणसं ती घालून मोकळे होतो .पण तुला हलकं काम करणारा हे समजून किती विचित्र वागतो नाही आम्ही .काम हे काम असते आणि तू किती प्रामाणिकपणे करतोस .किती मेहनत आहे याच्या मध्ये मला उमगलं म्हणूनच मी त्याला म्हंटलं की बरोबर आहे तुझं .तू नक्कीच खूप मोठ काम करतोस .आई वडिलांच्या कामांमध्ये मदत करण आणि स्वतःचे शिक्षण ही सांभाळणे हे खूप मोठ्ठ आहे .तेव्हा त्याचे बाबा म्हणाले हा एवढेच नाही करत. याने चपला आणि बूट नवीन नवीन प्रकारचे शिवून टाकलेले आहेत. बनवलेत .आता बाहेर गावी जात आहे विकायला. माझ्या तोंडाचा आ आ राहिला .पहातच बसले मी त्याच्याकडे कौतुकाने .त्याला म्हटलं अरे बघू त्या डिझाइन्स कसे आहात चपला मला दाखव की .त्याने दाखवलेल्या चपला आणि ते बूट सुंदर होते खूप नाविन्य होतं आणि इतक्या हलक्या .मी त्याला म्हंटलं अरे पण या बाहेरगावी म्हणजे नक्की कुठे जातात चपला .तो म्हणाला माझ्या चपला आणि माझे बूट हे अमेरिका जपान रशिया आणि नेदरलॅंड ला जातात .पण मला सगळ्या जगात हा माझा ब्रँड पसरवायचा आहे .धन्य ती माऊली आणि धन्य ते वडील त्यांनी अशा सुपुत्रांला जन्म दिला आणि स्वतःच्या जातीच्या स्वतःचा कर्माचा स्वतःच्या कामाचा गौरव केला .कुठलीही कामे हलकं नसतात कारण काम हे कामच असतं कष्ट मात्र आतोनात घ्यावे लागतात
तेव्हाच ते फळतं मी त्या मुलांला खूप सार्‍या शुभेच्छा देऊन आणि त्याच्याकडं आमच्या घरातल्या सर्व मेंबर साठी चपलांच्याऑर्डर देऊन तिकडून निघाले.

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments