नृत्य …आरोग्याचा श्वास

नृत्य..आरोग्याचा श्वास –

 

 

तक थेई..ता थई.तक थई

काही जणांना उपजत देणगी असते.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.हे काही खोटे नाही.

स्वरा चा जन्म झाला.बाळ नेहमीप्रमाणे रडत आले.

पण अगदी थोडावेळ कारण नंतर एक दो..तीन चार पाच छे.. डिंग डाँग डिंग. गाणे लागले आमची ही छोटी माधुरी चक्क गप्प बसली व नंतर हात पाय हलवू लागली.

झाले आता स्वराच्या घरच्यांना उद्योग मिळाला तिला त्या गाण्यावर नाचवायचा.

आणि ते छोटे पिल्लू आनंदात नाच काम करी.

आता शाळेबरोबर स्वराचे नृत्य शिक्षण ही सुरू झाले.

अभ्यासात हुशार.आणि नाच तर काय आवडीचा.

एकदा शाळेत जाताना तिला स्कूटर चा धक्का लागला

व पाय फ्रॅक्चर झाला.

पण स्वरा मात्र जिद्दी .तिने त्या वेळात सुद्धा जिद्दीने सर्व तोडे पाठ करून घेतले.

नृत्य तिचा श्वास होता.सकारात्मक जगण्यासाठी मदत करणारा.

शिवाय तिचा फिटनेस सुद्धा उत्तम झाला होता.

कमनीय बांधा व सुडौल शरीर व आत्मिक आनंद आणि समाधान उत्साह हे सर्व तिच्याकडे ओसंडून वाहत होते.

आता तिचे प्रोग्रॅम सुरू झाले 

त्यातच ती नृत्य शिक्षिका म्हणून क्लास घेवू लागली

पैसे मिळत होते.

नृत्याने तिचे जीवन बहरले होते .आता तिला तसाच तिच्या नृत्यावर फिदा असणारा जीवनसाथी मिळाला खूप छान दिवस होते 

पण अचानक एके दिवशी त्याला कॅन्सर झाला व सर्वच हादरले.

स्वरा जिद्दी.

तिने नृत्यातल्या भावमुद्रा दाखवून त्याला करायला लावल्या.

तिचा जीवनसाथी स्वरासाठी त्या आत्मसात करत होता 

हळू हळू त्याची प्रकृती सुधारत चालली.

आणि आता तो ही उत्तम नर्तक झाला.

दोघेही शोज करू लागले 

तर अशी असते नृत्याची साथ.

  • दोघांचाही नृत्य हा श्वास झाला.

 

 

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments