सावली..भरून पावली

सावली मी…भरून पावली

तिची सावली पण नको पडायला

सावली… ऐकलेला हा पहिला शब्द

त्यावेळी खूप रडू यायचं वाईट वाटायचं

का का असं बोलत होते वांझ होती मी म्हणून काय माझा दोष होता माझ्या नवऱ्या चा होता पण खापर मात्र माझ्यावर पडल गेल आणि हा शब्द सावली सारखा कायमचा बसला.सलत बसला काट्यासाखा टोचत बसला

हळूहळू दिवस नेहमीप्रमाणे जात गेले आणि तो छोटू म्हणजेच आश्रमातून आणलेला बाळ माझी सावली झाला

त्याला मोठं करण्यामध्ये आणि त्याच्या मागे सावलीसारखी उभी राहण्यास जी काही सावली ने मदत केली अवर्णनीय म्हणूनच हा शब्द खूप प्रिय आहे कारण तिला मनाचे रिक्त पण भरून काढता येत.उन्हाची झळ लागते तसेच आयुष्यात पण चटके सोसावे लागतात तेव्हा कोणीतरी सावली दिली म्हणजे प्रेमाने मायेने त्याच्यात ओलावा येतो आणि तो ओलावा आणला माझ्या नणंदे नी

माझ्यामागे सावलीसाठी भक्कम होती म्हणूनच मी खचले नाही आणि मग माझ्या मुलाची मी सावली कधी झाले कळले नाही

त्यादिवशी आम्ही चौघं म्हणजे मी माझा छोटू आणि माझी नणंद आणि तिचा बबड्या एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात म्हणून वनराई ला गेलो होतो तिथे खूप झाडे आणि त्या झाडांची सावली पण मधूनच येणारा पानांमधून किरणांचा प्रकाश तिरीप ती हवीहवीशी वाटत होती कारण जोडीला सावली होती

अशी ही सावली स्वतः मात्र काळीसावळी पण दुसऱ्याला थंड थंड करणारी मनामध्ये त्यांना शांत करणारी

तिला तिचे भोग भोगावेच लागले

अगदी पहिल्यापासून शनि पुत्र हा सूर्यदेव आणि संज्ञा देवी म्हणजेच सूर्याची सावली छाया यांचा पुत्र . छाया सावळी आणि शनिदेव पण तसाच.म्हणूनच मला विचारायचे संज्ञा देवी म्हणजे छाया देवी काळी होती सावळी होती हे सूर्यदेवाला माहिती होतंच ना तिच्यापासून पुत्र का उत्पन्न केलास आणि शनिदेव काळा म्हणून त्याचा प्रथम रागच केलास का????

असंच असतं सावली

आपण फक्त साथ द्यायची .

पण आपली सावली आपल्याला दिसत नाही आणि दुपारी बाराच्या उन्हामध्ये ती कधी गुप्त होते कळत नसते पण आपली साथ न सोडणारी भरभक्कम पणे आपल्या मागे उभी राहणारी एकुलती एकच ती म्हणजे आपली सावली

म्हणूनच तिची कीव करायला तिचा तिरस्कार करायला मन कधीच तयार नाही कारण ती आहे म्हणूनच मी आहे.

हजारो. लाखो वाटसरु ना सावली देणारे वृक्ष

उन्हाळ्याच्या कचाट्यातून सोडवणारी

आडोसा देणारी

अशी ही प्रेमळ उबदार सावली

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments