आई

आई म्हणजे आईच

दुसरे नसते काहीच

आई म्हणजे ममत्व

आई म्हणजे श्रेष्ठत्व

आई म्हणजे अपार माया

नसते दुषिताची छाया

आई म्हणजे कष्टाची तयारी

शिस्त लावण्याची तऱ्हाच न्यारी

आई म्हणजे कधी काली तर कधी दुर्गा

कधी रागिणी तर कधी रणचंडी

कधी रेणुका तर कधी भवानी

कधी असते तिच्या डोळ्यात पाणी अनेक झेलते ती उन्हाळे-पावसाळे

लेकरांसाठी वेचते ती आयुष्य जगावेगळे कधी कष्टाचं ना तिच्या होते मोल

आई म्हणजे आईच हा शब्दच अनमोल…

 

 

 

 

 

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Vilas Joshi

सुंदर