उन्हाळ्यातील आहार

उन्हाळयातील आहार

ऊन +आहळ
आहाळ म्हणजे पाण्याचा धबधबा
उन्हाळ्यात शरीरातून खूप पाणी बाहेर जाते..घामा द्वारे
डोके तापते…पाय तापतात.अंगाची लाही लाही होते.
उन्हाळा बरोबर जवळचा शब्द म्हणजे शहाळ
बरोबर आणि शाहळ कसे गोड पाणी व थोडी मलई
उष्णतेच्या एकदम विरुद्ध थंड व खूप सारे नैसर्गिक विटामिन्स असणारे फळ.
ताडगोळे..अगदी त्याच्या जवळचा. उन्हात प्रकृतीला थंडावा
देणारा..
कोकणचा मेवा म्हणजे आंबे फणस कोकम. जाम
या सर्वांचे खूप प्रकार करून खाल्ले की उन्हाळा हां हां म्हणता संपतो.
कोकम सरबत…कोकम सर.
आंब्याचे सरबत
आंब्याचे पन्हे
कैरीचे पन्हे
आता बाकीची महत्त्वाची फळे कलिंगड… चिबुड..टरबूज खरबूज
लिची
व घरातले नेहमीचे पदार्थ दूध दही अमृततुल्य ताक. मठ्ठा
साजूक तूप तर हवेच.
भरपूर पाणी पोटात गेले की ऊन काही लागत नाही.
म्हणूनच वेगवेगळी सरबत.. खस चे सरबत..मोगरा सरबत.
गुलाबाचे सरबत व गुलकंद
हलका सुपाच्य आहार असावा
तेलकट नको..जड पदार्थ नको
सकाळी उकड्या तांदळाची पेज कधी
तर दही भात कधी अशी न्याहारी
पोटाला थंडावा देतात
जेवणाशेवटी विड्याचे पान त्यामध्ये. वेलची गुलकंद हवा थंड पोटाला शांत.
शेवटी काय तर पोट थंड तर डोके थंड
मन थंड मग शरीर आपोआच थंड
….. प्रातिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments