आम्ही पुणेकर

हिरवळ सुंदर , शाही राहणे
पक्षांचेही मंजुळ गाणे
स्वछ पुणे,सुंदर पुणे

शिवरायांच्या इतिहासाने
गजबजलेले ऐतिहासिक पुणे
स्वछ पुणे,सुंदर पुणे

मुळा-मुठा नद्यांचे बारमाही वाहणे
दुष्काळाची खंतच न भासणे
स्वछ पुणे,सुंदर पुणे

वेगवेगळ्या चवींचे असते पुणेकरांचे खाणे
पाणीपुरी ,दहीवडे अन भेळेवरती रुचले शेंगदाणे
स्वछ पुणे,सुंदर पुणे

मॉडर्न वेस्टर्न इथे चालणे
साड्यांवर अजूनही गाजर माळणे
स्वछ पुणे,सुंदर पुणे

ओल्या सुक्या कचऱ्याचे इथे वर्गीकरण असते
स्वच्छतेतही आमचे पुणे बाजी मारते
आमच्या हक्काचे पुणे
म्हणूनच मी म्हणते  पुणे तिथे काय उणे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments