ऑनलाईन शाळा

स्वप्नात आली शाळा माझ्या आवडीची
रडत होती बिचारी आठवण काढून मुलांची

रडते मात्र बिचारी शाळा
मुलांचा तिला फारच लळा

सुने सुने बाक अन सुने वर्ग
तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हीच गर्क

ऑफलाईन शाळेला सुट्टी तर ऑनलाईन शाळेला सुरुवात
मग कशी राहील शाळेची शिस्त तुमच्या स्मरणात

ऑफलाईन शाळेची शिस्त ही न्यारी
ऑनलाईन शाळेत तासाला देखील खातात चहा सोबत खारी

नसतो आता शाळेत मित्रमैत्रिणींचा कट्टा
तर ऑनलाईन शाळेची मित्र करतात थट्टा

लॉकडाउनच्या सुरुवातीला ऑनलाईन शाळेची आली मजा
पण घरात राहून शाळा ऐकण्याची आता वाटते सजा

सरुनीने दिवस लॉकडाउनचे सुरु झाली आता शाळा
मौजेचे दिवस संपले आता शिस्तीकडे वळा

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments