प्रचंड ताकद वाढवणारा दगड

शिलाजीत हे नाव तुम्ही ऐकले असेलच. शिलाजीत म्हटल्यावर दचकलात ना ? खरंच आहे, प्रसार माध्यमातून प्रसिध्द झालेल्या जाहिरातींमुळे शिलाजीतचा एकच उपयोग आपल्याला माहिती आहे. त्यामुळेच तर कुणी शिलाजीत घेतय म्हटलं की आपल्या भुवया वर जातात. पण लैंगिक क्षमता वाढवणारे औषध एवढीच शिलाजीतची ओळख नाही. खरं तर या अपप्रचाराने आयुर्वेदातील एक चांगली औषधी उपेक्षित राहिली असेच म्हणावे लागेल.
न सोsस्ति रोगो भुवि साध्यरुपो
जत्त्वश्मजं यं न जयेत्प्रयुक्तं
तत्काल योगैर्विधिवत्प्रयुक्तं
स्वस्थस्य चोर्जा विपुलां दधाति ।।१४३।।
महर्षि वाग्भटजीनीं त्यांच्या अष्टांगह्रदयम् या ग्रंथातील उत्तरस्थानाच्या, अध्याय ३९ मध्ये वरील श्लोकातून शिलाजीताची उपयुक्तता अधोरेखित केली आहे. शिलाजीताने बरा होणार नाही असा जगात साध्य रोगच नाही असे सांगून ते या श्लोकात म्हणतात, निरोगी मनुष्यास तर योग्य रीतिने घेतल्यास याने फार शक्ती येते.

हे वाचून शिलाजीताविषयीचा मनातील संभ्रम दूर झाला असेलच. आता शिलाजीत विषयी सविस्तर माहिती पाहू –
शिलाजीत हा हिमालयातील खडकातून पाझरणारा पदार्थ आहे. बाभळीच्या झाडातून जसा डिंक पाझरतो तसा उष्णता वाढली की हिमालयातील दगडातून हे शिलाजीत पाझरते. ते जमा करुन त्याचे आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या प्रक्रियेने शुध्दीकरण केले जाते. त्यानंतर शिलाजीत खाण्यासाठी योग्य होते. पूर्ण नैसर्गिक आणि शुध्द शिलाजीत ओळखण्याच्या दोन सोप्या कसोट्या आहेत. पहिली म्हणजे त्याला गोमूत्रासारखा वास येतो आणि त्याचा रंग काळा असतो. दुसरी म्हणजे कोमट दुधात किंवा पाण्यात ते पूर्ण विरघळते.

शिलाजीतचे गुण – शिलाजीत समशितोष्ण आहे. म्हणजे ते उष्णही नाही आणि थंडही नाही. अधिक प्रमाणात किंवा चुकीच्या पध्दतीने घेतले तर मात्र त्याचा स्वभाव थोडा उष्ण जाणवतो. ते कडू, तिखट आणि तुरट चवीचे असते.

अशा या शुध्द स्वरुपातील शिलाजीतचे उपयोग पाहू –
१. धातूंचे पोषण – आपले शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सात धातूंनी बनलेले आहे. जेव्हा हे सातही धातू चांगले असतात तेव्हा शरीर सुदृढ असते. कोणतेही औषध जेव्हा धातूंची पुष्टी करते तेव्हा ते याच क्रमाने करीत असते. शिलाजीत ही तसेच सगळ्या धातूंची पुष्टी करते आणि शेवटी शुक्र धातू बलवान करते. त्यामुळे शिलाजीतने केवळ लैगिक सामर्थ्यच वाढते असे नाही तर शिलाजीतमुळे सगळे शरीरच बलवान होते. लैंगिक सामर्थ्य वाढणे हा शिलाजीतच्या अनेक उपयोगांमधील एक उपयोग आहे. लैंगिक सामर्थ्य वाढविण्यासाठी या सोबत अश्वगंधा आणि सफेद मुसळी घेतल्यास अधिक चांगला फायदा दिसतो.

२. डायबेटिस – मेह, प्रमेह, मधुमेह अर्थात डायबेटिसमध्ये शरीराची झीज मोठ्या प्रमाणात होते. शिलाजीत ती झीज भरुन काढते आणि पेशींची ताकद वाढविते. शिलाजीतमुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रीत राहते. मधुमेहामुळे येणारा थकवा, निरुत्साह, अधिक झोप यासारखा त्रास कमी होतो. आचार्य वाग्भट महर्षिनी त्यांच्या अष्टांगह्रदयम ग्रंथाच्या चिकित्सास्थानातील बाराव्या अध्यायात खालील श्लोक लिहिला आहे.
मधुमेहित्वमापन्नो भिषरिभः परिवर्जिताः ।
शिलाजतुतुलामद्या त्प्रमेहार्तः पुनर्नवः ।।४२।।
आयुर्वेदात मधुमेहाचे वीस प्रकार सांगितले आहेत. ज्याचे मूत्र हे मधासारखे जाड, गोड आणि मधाच्या रंगाचे होते त्याला आयुर्वेदात मधुमेह म्हटले आहे आणि तो असाध्य म्हटला आहे. त्यापूर्वीच्या अवस्थांना मेह, प्रमेह अशा संज्ञा देण्यात आल्या आहेत. वरील श्लोकात ज्याचा मेह मधुमेहत्व पावला आणि ज्याच्यावर उपचार करण्याचे वैद्याने साडून दिले आहे, असा रुग्णही शिलाजीताच्या योग्य वापर केल्यास पुन्हा अगदी नवा होतो, असे महर्षि वाग्भट यांनी म्हटले आहे.

३. पित्तामुळे येणारा अशक्तपणा – अँसिडिटीमुळे जेवणावर परिणाम होतो. त्यामुळे धातूंचा क्षय होतो. अशा स्थितीत हा क्षय शिलाजीतमुळे भरुन निघतो.

४. मूतखडा – शिलाजीत हे मूत्रवहन संस्थेतील विकारात उत्तम फायदा देते. शिलाजीत दगड फोडून बाहेर येत असल्याने फोडणे हा त्याचा गुणधर्म मूतखड्यातही उपयुक्त आहे. फक्त हा उपाय तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात करावा.

५. अकाली वृध्दत्व – अनेकजणांच्याबाबत स्ध्या हे आढळते. वयापेक्षा अधिक म्हातारे दिसण्याला अकाली वृध्दत्व म्हणतात. शिलाजीतच्या उपयोगाने यावर मात करता येते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे यावरही शिलाजीत प्रभावी आहे.

६. दमा / अस्थमा – दमा किंवा अस्थमा हा आजार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होतो. शिलाजीत सप्तधातूंना बलकटी देत असल्याने शरीर बलवान बनते आणि रोग प्रतिकारक शक्ती बळकट होऊन दमा आणि अस्थम्यात आराम मिळतो.

७. मेंदूचे टॉनिक – शिलाजीत हे मेंदूचे टॉनिक आहे. त्यामुळे सतत बौध्दिक काम करणा-यांना थकलेल्या मेंदूला संजीवनी देण्यासाठी उपयुक्त आहे. विस्मरणाच्या त्रासातही शिलाजीत फायदेशीर आहे.

८. दोन प्रकारच्या मूळव्याधी असतात. यातील ज्या मूळव्याधीत रक्त पडत नाही त्या मूळव्याधीत शिलाजीतचा चांगला फायदा होतो.

९. अकाली केस पांढरे होणे, गळणे अशा विकारातही शिलाजीत फायद्याचे ठरते.

१०. शिलाजीत हे विविध नैसर्गिक घटकांनी परिपूर्ण आहे. शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक शिलाजीतमध्ये नैसर्गिक स्वरुपात असतात. त्यामुळे शिलाजीत हे उत्तम टॉनिक म्हणूनही उपयुक्त आहे.

शिलाजीतचे आयुर्वेदाच्या विविध ग्रंथात खूप उपयोग सांगितले आहेत. याशिवाय विविध आयुर्वेदिक औषधांच्या सोबत शिलाजीत घेतल्याने मिळणारे फायदेही खूप आहेत. हे सगळे इथे लिहिले तर खूपच मोठा विस्तार होईल. थोडक्यात सांगायचे तर विविध आजारात औषध म्हणून तर काहीही झालेले नसेल तर टॉनिक म्हणून शिलाजीत सगळ्यांनाच उपयुक्त आहे.

असे हे मौल्यवान शिलाजीत शंभर टक्के नैसर्गिक आणि शुध्द स्वरुपात आम्ही गेली पाच वर्षे उपलब्ध करुन देत आहोत. तुमच्या पत्त्यावर ते कुरिअरने पाठवण्याचीही व्यवस्था आहे. शिलाजीतची डबी २० ग्रॅमची असते. एवढेसे शिलाजीत एका व्यक्तीला साधारण दोन महिने पुरते. वीस ग्रॅमच्या या डबीची किंमत मात्र फक्त १००० रुपये आहे. तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन आपल्या ऑनलाईन स्टोअरवरुनही शिलाजीत खरेदी करु शकता.
https://aknaturopathy.online

आपला
आनंद वामन कुलकर्णी (D.Y.N.D.)
निसर्गोपचार, योगा, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर – ४१६१०१
मोबाईल / व्हॉटस अँप – 7744964550

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments