जीवन हे जगायचे असते

जीवन हे जगायचे असते
कुढत कुढत बसायचे नसते
जीवनाला वळण लावायचं असते
जीवन हे अर्धवट सोडायचं नसते
जीवन हे जगायचे असते

भरभरून जगायचं असते
खूप काही सोसायचं असते
खूप काही जगायचं असते
खूप काही शिकायचं असते
जीवन हे जगायचे असते

कोणी तरी खुसपट काढत असते
कुणीतरी मागून हसत असते
कुणी तरी खूप कौतुकाने बोलते
कोणतरी समोरून रडवून जाते
पण जीवन हे नटवायचं असते
जीवन हे जगायचे असते

जीवनाला घाबरून पळायचे नसते
जीवनाला असोशीने घडवायचे असते
जीवनाला धडक देत बसायचे असते
पाय मागेपुढे ओढणारे खूपच असते
जीवन हे पळवायचे असते
जीवन हे जगायचे असते

जीवन हे नेहमी सुंदरच असते
जीवनात बहार आणणे आपल्या हातातच असते कर्म नशीब वगैरे काही नसते
कारण जीवन हे आपणच घडवायचं असते जीवन हे जगायचे असते

प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments